-जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक यांना जिवे मारण्याचा प्रयत्न
-जिल्हाधिकारी मॅडम गेवराई तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांना हाकलाच!प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी वाढली असून चक्क शुक्रवारी (ता. 26) पहाटे तीनच्या दरम्यान मादळमोही परिसरात जिल्हाधिकारी यांच्या गाडी एका हायवाने चक्क कट मारत जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी हायवा चालकांने रस्त्याच्या मधोमध वाळू टाकली, यात जिल्हाधिकारी यांची गाडी फसली. जिल्हाधिकारी यांनी तात्काळ पोलीस अधिक्षकांना फोन करत झालेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर लगेच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी यंत्रणा कामाला लावत गेवराई पोलीस जिल्हाधिकारी यांच्या मदतीला पाठवले. यानंतर जिल्हाधिकारी यांची फसलेलर गाडी ट्रॅक्टरच्या मदतीने काढण्यात आली. यासर्व प्रकारानंतर जिल्हाधिकारी बीडला आल्या. दुसरीकडे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्या हायवाच्या शोधासाठी अनेक पथके रवाना केली होती. काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेने हायवासह चालकांला ताब्यात घेतलेे.
सविस्तर वृत्त असे की, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे ह्या आज (ता. 26) सव्वा तीनच्या दरम्यान छत्रपती संभाजी नगर हुन बीडकडे येत होत्या, याच दरम्यान गडी जवळ त्यांच्या समोर वाळूने भरलेले हायवा त्यांना दिसला. त्यांनी त्यांचे अंगरक्षक अंबादास सुरेश पावणे यांना सांगितले की, त्या हायवाला थांबवा यांनतर जिल्हाधिकारी यांच्या चालकांने त्या हायवाला थांबविण्यासाठी हायवाच्या पुढे त्यांची गाडी घेतली. यानंतर अंगरक्षक पावणे यांनी त्यांच्या गाडीचा काच खाली घेत हायवा चालकाला हायवा थांबविण्याच्या सुचना केल्या परंतू त्या हायवा चालकांने गाडीची स्पीड कमी करण्या ऐवजी वाढवली हे जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांच्या चालकाला गाडी बाजूला घेण्याचे सांगितले. यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्या हायवाचा पाठलाग सुरु केल्या. यानंतर त्या हायवाने मादळमोहीकडे हायवा घेतला. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा त्याचा पाठलाग सुरुच ठेवला. यानंतर त्यांने एका सिग्नल रस्त्याने हायवा घेत रस्त्याच्या मधोमध वाळू टाकली. याच वाळू मध्ये जिल्हाधिकारी यांची गाडी फसली. यानंतर हायवाची स्पीड कमी झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक पावणे यांनी हायवा चालकाच्या बाजूने जात ते वर चढले. परंतू परत त्या हायवा चालकांने गाडीची स्पीड वाढवली. तो हायवा चालक जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक पावणे यांना म्हणाला की, तुम्ही उतरला नाही तर मी तुम्हाच्या बाजूने असणाऱ्या झाडाला गाडीची धडक देईल. यानंतर रस्त्याच्या बाजूच्या झाडाची फांदी अंगरक्षक यांच्या हाताला लागल्यामुळे ते खाली पडले. जवळ पास त्या हायवा चालकाने पावणे यांना तीन किलोमिटर नेले होते. यानंतर अंगरक्षक जिल्हाधिकारी यांच्या गाडी जवळ आले व त्यांनी झालेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांना फोन करुन सर्व प्रकार सांगत योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना केल्या. यानंतर काही वेळात गेवराई पोलीस त्याठिकाणी आले व त्यांनी जिल्हाधिकारी यांची फसलेली गाडी काढली. यानंतर जिल्हाधिकारी बीडला आल्या. दुसरीकडे त्या हायवाचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक्षक यांनी विशेष पथके रवानी केली होती. घटनेच्या काही तासाच हायवा व चालकाला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक पावणे यांच्या फिर्यादीवरुन हायवा (क्रमांक एमएच 23 6786) व चालक प्रकाश सुधाकर कोकरे वय 27 यांच्यावर भा. द.वी. 307,353 प्रमाणे गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक व हायवा पोलीसांनी काही तासाच ताब्यात घेतला. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गंभीर दखल घेत ही माफियागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत.