पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी घेतला निर्णय
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील व जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या दोन्ही नेत्यांना आज पक्षातुन काढण्याची घोषणा करण्यात आली.
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून काम करणारे जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील व माजलगाव भागाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. काल (ता. १८) आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून केला होता. याच घटनेच्या ठिकाणी जाधव यांची गाडी सुद्धा फोडण्यात आली होती, या सर्व बाबीचे अनुषंगाने पक्षाने आप्पासाहेब जाधव व धोंडू दादा पाटील यांना यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.