प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : बीड-अंमळनेर रोडवरील एका बिअरबारच्या पाठीमागे जुगारअड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली होती. यानंतर पोलीस अधीक्षक पथकाचे प्रमुख विलास हजारे व त्यांच्या टिमने त्याठिकाणी जावून छापा मारला असता याठिकाणी सहा जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. यासह पावणेदोन लाखाचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बीड अंमळनेर रोडवर जय बियरबारच्या पाठीमागे सुरेश अरुण पोकळे यांच्या मालकीच्या जागेतच्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारला असता सहा इसमांना जागीच पकडण्यात आले त्यांच्याकडून 12,500 नगदी रक्कम तसेच मोबाईल व जुगाराचे साहित्य मोटरसायकल असे एकूण 1,83,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच मिळून आलेले आरोपी 1) आजिनाथ भाऊ फरताडे राहणार पांढरवाडी ता. पाटोदा जि. बीड 2) नामदेव माणिक जाधव राहणार चिंचोली तालुका पाटोदा जिल्हा बीड 3) विठ्ठल किसन पवार ,राहणार शिंदेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर 4,,) राजू गजेंद्र जाधव राहणार चिंचोली तालुका पाटोदा जिल्हा बीड 5) सुग्रीव बाजीराव मिसाळ राहणार डागाची वाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड 6) तुकाराम भीमराव गायकवाड राहणार कोतन तालुका पाटोदा जिल्हा बीड असे जागीच जुगार खेळताना मिळून आलेले 06आरोपी व क्लबच्या जागेचा,क्लबचा मालक सुरेश अरुण पोकळे असे 07 विरुद्ध कलम 12 (अ )महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये अंमळनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब,अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख सपोनी विलास हजारे, तसेच पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई सचिन काळे, शिवाजी डीसले, विनायक कडू, यांनी केली आहे.