अंबाजोगाई प्रतिनिधि – मागील दोन दिवसांपासुन बी एड सीईटी च्या परिक्षांना सुरूवात झाली असुन तिसऱ्याच दिवशी शिक्षण विभागाचा गोंधळ कारभार काल अंबाजोगाई येथील परीक्षाकेंद्रावर परिक्षार्थांसोबत घडला, परिक्षे करीता देण्यात येणार प्रवेश कार्ड दोन प्रकारे पुर्व कल्पना न देताच परिक्षार्थीनां परीक्षेच्या वेळेच्या काहि मिनीटा पुर्वी मिळाले आणी परिक्षार्थींचा गोंधळ उडाला ऐनवेळी परीक्षाकेंद्र रद्द करून परीक्षाकेंद्र बदलण्यात आले तर काही परिक्षार्थींच्या परिक्षेची तारीख बदलून परीक्षेच्या एक दिवस आधी परिक्षा घेण्यात आल्याचे निदर्शनास आले कोणतीही पुर्व कल्पना न देता विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान ह्या शिक्षण विभाग व परिक्षानियंत्रक सीईटी सेल यांच्या कडुन करण्यात आले असून या नव्वद विद्यार्थांची परीक्षा हि अंबाजोगाई येथील योगेश्वरी पाॅलिटेक्नीक काॅलेज येथील परीक्षाकेंद्रावर होणार होती ती परिक्षा न देता विद्यार्थी तसेच घरी परतल्याने या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने या विद्यार्धांच्या पुन्हा परीक्षा घेण्यात याव्या आशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख अक्षय भुमकर व युवासेना विधानसभा प्रमुख अभिमन्यु वैष्णव यांनी शिक्षण मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री , परिक्षानियंत्रक सीईटी सेल यांच्या कडे केली असून उपजिल्हाधिकारी यांना विद्यार्थांनी व युवासेनेच्या पदाधिकार्यांनी निवेदन देऊन करण्यात आली.
काल नियोजित वेळेवर परिक्षार्थी हे आठ वाजता अंबाजोगाई येथील योगेश्वरी पाॅलिटेक्नीक काॅलेजच्या परीक्षाकेंद्रावर हजर झाले असता त्यांना परीक्षाकेंद्रावरून याठिकाणी त्यांची परीक्षा नसल्याचे सांगण्यात आले व याठीकाणी इतर परिक्षा असल्याने परीर्क्षार्थांना या ठीकाणी बीएड सीईटी ची परिक्षा देण्यात येणार नाही व यासाठीचे लागणारे साहित्य उपलब्ध होणार नसल्याचे व परिक्षा दिनांक 25 एप्रिल रोजी झाल्याचे सांगण्यात आले या गोंधळात विद्यार्थांना टाकून परीक्षाकेंद्रावरील व्यवस्थापनेने या विद्यार्थांना दुसरे प्रवेश कार्ड घेऊन त्या परीक्षाकेंद्रावर जाण्यास सांगीतले असता युवासेनेचे पदाधिकारी त्या ठीकाणी जाऊन या विद्यार्थांची व्यथा शिक्षण मंत्री व विधानपरिषद विरोधीपक्ष नेते यांना सांगून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मांडली. या वेळेस मोठ्या संख्येत विद्यार्थी परीक्षार्थी उपस्थित होते, तसेच अंबाजोगाई युवासेना तालुकाप्रमुख अक्षय भुमकर यांनी शिक्षण मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व परिक्षानियंत्रक सीईटी सेल यांना या अंबाजोगाईच्या योगेश्वरी पाॅलिटेक्नीक परीक्षाकेंद्रावर परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता या नव्वद विद्यार्थांची पुन्हा परिक्षा घेण्याची मागणी केली असून या विद्यार्थांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे या विद्यार्थांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.