शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांची एसपींकडे तक्रार
Beed ः शहरातील भगवान बाबा हिंदु स्मशानभुमीच्या जागेवर होत असलेले अतिक्रमण थांबवून जातीय सलोखा कायम ठेवावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांची पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्याकडे बुधवारी (दि.26) निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, बीड शहरातील खासबाग रोडवरील हिंदु समाजाची भगवान बाबा स्मशानभुमीची जागा आहे. परंतु याठिकाणी काही लोकांकडून स्मशानभुमीच्या उर्वरीत जागेवर जुने कंपाऊंड तोडून नवीन कंपाऊंड करून स्मशानभुमीची जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या असून दोन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यामुळे नगरपालिका प्रशासनासह पोलिसांनी वेळीच अतिक्रमण करणार्या लोकांवर कारवाई करून अतिक्रमण काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांची पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्याकडे केली आहे. निवेदन देताना मुळूक यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर, युवासेना जिल्हाप्रमुख सुमित कोळपे, सुभाष नाईक, गणेश पाळणे, संदीप उबाळे यांची उपस्थिती होती.