जयभवानी शिक्षण संकुलात सेवापुर्ती समारंभ थाटात संपन्न
गेवराई प्रतिनिधी : गेवराई तालुक्याच्या ग्रामिण भागातील मुला मुलीमध्ये कौशल्य आहे, हे ओळखून त्यांना संधी देण्यासाठी आदरणीय दादांनी शिक्षणसंस्था स्थापण केल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना नौकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. दादांनी पाहिलेले स्वप्न तुमच्या सर्वांच्या साक्षिने साकार झाले. शिवछत्र परिवार कायम तुमच्यासोबत आहे असे प्रतिपादन युवानेते रणवीर अमरसिंह पंडित यांनी केले. जयभवानी विद्यालय, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सेवापुर्ती गौरव समारंभात बोलत होते.
जयभवानी विद्यालयातील प्रा.शिवाजी पवळ, प्रा. बंडू शेवाळे, हरिनारायण कोकाट आणि रामदास शिंदे हे शिक्षक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापुर्ती निमित्ताने गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शारदा क्रिडा ॲकडमीचे संचालक रणवीर अमरसिंह पंडित, जयभवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सभापती जगन पाटील काळे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, विकासराव सानप, खांडवीचे सरपंच गोपाळराव शिंदे, अशोकराव नाईकवाडे, प्राचार्य डॉ एस. डी.पटेल यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणवीर पंडित पुढे म्हणाले की, ज्यांनी तुम्हाला नौकरीच्या तीस पस्तीस वर्षात साथ दिली त्या परिवाराला आता वेळ द्या. शिवछत्र परिवाराशी तुमची जुळलेली नाळ पुढेही कायम ठेवा. येणाऱ्या काळात शिवछत्र परिवार कायम तुमच्यासोबत आहे असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी कु. शेख सानिया या विद्यार्थिनींने मनोगत व्यक्त केले. प्रातिनिधीक स्वरुपात बोलताना रामदास शिंदे म्हणाले की, ज्या शाळेत मी शिकलो त्याच शाळेत आदरणीय शिवाजीराव दादांनी सेवा करण्याची संधी दिली हे मी माझे भाग्य समजतो. शिवछत्र परिवाराच्या आशिर्वादाने मी चांगले काम करु शकलो, घडू शकलो असे भावनिक उद्गागार त्यांनी यावेळी काढले. आदरणीय शिवाजीराव दादा, आणि भैय्यासाहेब यांच्यामुळे आमची खरी ओळख निर्माण झाली असे प्रा. शिवाजी पवळ म्हणाले. याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे, उत्तमराव सोलाने, प्राचार्य डॉ. एस.डी.पटेल, सत्यप्रेम लगड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभाऊ हकाळे यांनी केले. सुत्रसंचलन रणजित बडे यांनी केले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सा़गता झाली. कार्यक्रमाला प्राचार्य वसंत राठोड, उपमुख्याध्यापक रणजित सानप, पर्यवेक्षक गायकवाड यांच्यासह भाऊसाहेब कदम, मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे, भास्कराव घारगे, माधव चाटे, इंजिनिअर गणेश हिंगे यांच्यासह सर्व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.