केतुरा गावच्या रुंदीकरणाला मंत्री भुमरे यांची रोख 51 हजारांची मदत
बीड(प्रतिनिधी) मला फार आनंद झाला तुम्ही जे काम करताय त्या कामाला माझा आणि माझ्या पक्षाची केंव्हाही मदत राहील आज केतुरा गावातील नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण होत आहे. यासाठीच मी आलो माझ्या हाताने नारळ देखील फोडलं मात्र या केतुरा गावाला मी कधीही काहीही कमी पडू देणार नाही, रुंदीकरणाचा प्रश्न मला समजला होता म्हणून मी या गावात आलो माझे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मला आग्रह केला होता तुम्हाला मदत म्हणून मी आजच 51 हजार रुपये डिझेल साठी देत आहे. यानंतर पानंद रस्ता असो मुख्य रस्ता असो गावातल्या कुठल्याही योजना असो त्यासाठी मी तत्पर राहणार आहे. गावाच्या आजूबाजूला पाणी आहे त्यामुळे माझं शेतकऱ्यांना आवाहन आहे की तात्काळ तुम्ही सर्वच शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की, तुम्ही फळ उत्पादनाकडे लक्ष दिले पाहिजे कुठल्याही अडचणी असो माझे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे सक्षमपणे तुमच्या पाठीमागे उभे राहतील. आजच नाही केंव्हाही तुम्ही हाक दिली तर तुमच्या गावात मी येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू नका सदैव शिंदे आणि फडणवीस सरकार तुमच्या पाठीशी असणार आहे अनेक गाव फिरलो मात्र केतुऱ्यासारखं गाव मी अद्याप पाहिलं नव्हतं, माझं भाग्य आहे की माझ्या लोकांनी मला तुमच्या गावात आणलं की तुम्हालाच नाही तर पंचक्रोशीतील जेवढेही गाव येतील त्या गावचा विकास माझ्या हाताने जेवढा होईल तेवढा मी करण्याचा आज मी तुम्हाला आश्वासित करतो त्यामुळे कोणीही घाबरण्याचं कारण नाही असा विश्वास मंत्री संदिपान भुमरे यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, चंदू नवले,भारत जाधव, गणेश उगले, सिंधू बेदरे, दिलीप गोरे, महादेव तुपे, गोवर्धन काशिद, जे.पी. शेळके, बळीराम गवते, राजेंद्र मस्के, बापूराव चव्हाण, रणजित कदम, विकास गवते, बाबुराव पडुळे, परमेश्वर तळेकर, नंदलाल पाटील, आप्पासाहेब बोस्कर, पांडुरंग बोस्कर सखाराम मोहिते,कल्याण कवचट, आदी उपस्थित होते.
चौकट
◆ मंत्री संदिपान घुमरे हे पहिल्यांदाच श्री क्षेत्र नारायण गडावर नतमस्तक झाले. यावेळी महंत महादेव महाराज यांच्यासोबत घनिष्ठ चर्चा झाली. चर्चेवेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मंत्री घुमरे यांच्या कानात कुजबूज केली. याआधी देखील या गडावर निधी आला होता. मात्र तो मिळाला नाही असं सांगताच मंत्री भुमरे यांनी लागलीच तो निधी मिळून देऊ असा आश्वासन म्हणताना दिलं शिंदे गटाचे दोन्ही जिल्हाप्रमुखांनी मंत्री घुमरे यांचं मोठया उत्साहात केले.
◆ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे बोलताना म्हणाले, जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत तुम्हाला कुठलीही भीती बाळगण्याचे कारण नाही. केतुरा गाव तसं आमचंच आहे इथला जो मुख्य रस्त्याचा जो प्रश्न आणि पाणंद रस्त्याचं काम आहे. ते मंत्री महोदय संदिपान घुमरे यांनी आपल्याला तसा अभिवचन दिलेला आहे. त्यामुळे विकास कामात आम्ही कुठली हाय गय करणार नाही कोणी येतील जातील. मात्र आमच्या सरकार मधले मंत्री जे वचन देतात ते हरिश्चंद्रासारखं सत्यवादी वागतात यावेळी संबंध ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना प्रतिसाद दिला.