राञी घडणार्या अपघातामुळे पोलीस प्रशासनाचा निर्णय!
अपर अधिक्षक सचिन पांडकर यांनी जालना रोडवरील हाॅटेल चालकांना केल्या सुचना
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : नुकत्याच पार पडलेल्या आयजी तपासणी मध्ये जिल्ह्यात वाढलेले अपघात हे उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेलमुळे होत असल्याचे समोर आले आहे. या सर्व बाबीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन योग्य ते कारवाई करत असून साडेअकरा नंतर सुरू राहणाऱ्या हॉटेल, धाबे, बियर बार यांच्यावर आता कारवाईचा बडगा पोलीस प्रशासनाने उभारला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी काल मध्यरात्री जालना रोड परिसरातील २५ हॉटेल, धाबे, बिअर बार यांना भेटी देत हॉटेल चालकांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. जर साडेअकरा नंतर हॉटेल सुरू राहिल्यास योग्य त्या कारवाया करण्याच्या सूचना सुद्धा संबंधित अधिकार्यांना अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर केल्या आहेत.
राञी लेट सुरु असणार्या हाॅटेलमुळे दुचाकीचे अपघात वाढले आहेत हि बाब पोलीस प्रशासनाच्या सर्व्हेतून समोर आली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. राञी दोन पर्यंत सुरु राहणार्या हाॅटेलवर माञ आता कारवाई होणार आहे. जिल्ह्यामध्ये दुचाकी अपघाताचे प्रमाण वाढले असून बीड जिल्ह्यातील अनेक हॉटेल साडेअकरानंतर सुरू राहत असल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत हॉटेलमध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. या सर्व बाबींच्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली असून काल मध्यरात्री त्यांनी जालना रोड परिसरातील जवळपास 25 हॉटेल धाबे, बियर बार यांना अचानक भेटी देऊन योग्य त्या सूचना या चालकांना केल्या आहेत. यापुढे जर नियमांचे उल्लंघन केलं तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा या चालकांना अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिला आहे. तसेच संबंधित ठाणेदारांना सुद्धा योग्य त्या कारवाया करण्याच्या सूचना सुद्धा पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिले आहेत.
आमच्या सव्हेतून अशी माहिती समोर आली आहे की, राञी लेट पर्यंत चालू राहणार्या हाॅटेल मूळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यासर्व बाबींच्या अनूषंगाने आम्ही विशेष मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. संबंधित ठाणेदारांना सुद्धा योग्य सुचना केल्या आहेत. यापुढे जर लेट चालणार्या हाॅटेल, बिअरबार, धाबे यांच्यावर योग्य त्या कारवाया करण्यात येणार आहेत. ( अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,बीड)