बीड प्रतिनिधी : राज्याच्या आरोग्य विभागाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करणारे राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. तानाजी सावंत यांचा वाढदिवस बुधवारी (दि. १५) जिल्हा रुग्णालयाच्या वतीने मातृ – सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्त जिल्हा रुग्णालयात बुधवारी जन्मलेल्या मुलींना बेबी किट व मातांचा साडी चोळी देऊन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे ,रमा गिरी, डाॅ संतोष शहाणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मा. ना. तानाजी सावंत आरोग्य मंत्री म्हणून धोरणात्मक निर्णय घेण्याबरोबरच जिल्हा रुग्णालय पातळीवर देखील सेवेबाबत लक्ष देऊन असतात. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याबाबत संवेदनशिल असल्याने मा. सावंत साहेब यांनी सुरुवातीलाच महिलांसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबविले. स्त्री जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशिल असून याला चांगल्या प्रमाणात जिल्ह्यात यश येत आहे. त्यामुळे बुधवारी मा. तानाजी सावंत यांचा वाढदिवस मातृ – सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात बुधवारी जन्मलेल्या मुलींना जिल्हा रुग्णालयाच्या वतीने बेबी किट तसेच त्यांच्या मातांना साडी चोळी देण्यात आल्याचे डॉ. सुरेश साबळे म्हणाले. या सन्मानाने मातांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद पहायला मिळाला. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नेहमीच ग्रामीण भागातील व सामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात या प्रयत्नासह विविध उपक्रम राबविले जातात असेही डॉ. सुरेश साबळे म्हणाले.