मिल्लत उर्दू सेमी स्कूल, ढगे कॉलनी, गजानन नगर, शिक्षक कॉलनी भागतील विकास कामांची पाहणी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला
बीड प्रतिनिधी : बीड शहरात नगरोत्थान अंतर्गत सिमेंट रस्ते आणि नाल्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणचे कामे प्रगतीपथावर आहेत आणि काही ठिकाणी सुरू झाली आहेत. माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून मंजूर करून आणलेल्या शहरातील मिल्लत उर्दू सेमी इंग्लिश स्कूल परिसर, नाळवंडी नाका परिसरातील गजानना नगर, पेठ बीड भागातील शिक्षक कॉलनी येथे सिमेंट रस्ते आणि नाल्यांच्या कामांना सुरुवात झाली असून युवा नेते डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी करत कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
बार्शी नाका परिसरातील मिल्लत उर्दू सेमी इंग्लिश स्कूल असून या ठिकाणी जवळपास १२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र याठिकाणी रस्ता नसल्याने पावसाळ्यात विद्यार्थांना शाळेत ये जा करताना त्रास सहन करावा लागत होता. याचीच दखल घेऊन माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून आणला. आता या रस्ता आणि नाली कामाला सुरुवात झाली असून काही दिवसातच विद्यार्थ्यांबरोबर स्थानिक नागरिकांसाठी हा दर्जेदार रस्ता तयार होणार असल्याचे डॉ योगेश भैया क्षीरसागर यांनी सांगितले. नाळवंडी नाका येथील गजानन नगर भागात देखील स्थानिक नागरिक आणि महिलांच्या उपस्थितीत सिमेंट रस्ता आणि नाली कामास सुरुवात झाली. यावेळी डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी उपस्थित असलेल्या शेकडो महिलांशी आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मुख्य रस्ता दर्जेदार केल्याबद्दल आणि अंतर्गत रस्ते नाल्यांचा प्रश्न मर्गी लावल्याबद्दल स्थानिक नगरिकांनी डॉ.योगेश भैय्यांचा सत्कार करत आभार मानले. त्याचप्रमाणे शिक्षक कॉलनीत देखील सिमेंट रस्ते आणि नाल्यांच्या कामाला सुरुवात झाली. या कामाला देखील डॉ.योगेश भैया यांनी भेट देत आढावा घेत कामासंदर्भात संबंधित यंत्रणेला योग्य त्या सूचना केल्या.
याप्रसंगी डॉ.योगेश भैया क्षीरसागर म्हणाले की, ज्या ज्या वेळी मिल्लत उर्दू सेमी इंग्लिश स्कूल मध्ये ध्वजारोहनासाठी आलो त्या त्या वेळी येथे आल्यानंतर रस्त्याची अवस्था बघून या ठिकाणी दर्जेदार रस्ता आणि नाली बांधकाम व्हायला पाहिजे असे वाटले.या शाळेत येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परिसरातील स्थानिक नागरिक यांना अजून त्रास होऊ नये यासाठी ६० लाख रुपयांचे सिमेंट रस्ते आणि नाली कामे मंजूर करून आणले. आता ही कामे पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण करण्यात येतील त्यामुळे विद्यार्थांना आणि नागरीकांचा त्रास कमी होईल. गजानन नगर येथील स्थानिकांशी संवाद साधताना डॉ.योगेश भैया क्षीरसागर म्हणाले की, आम्ही नागरिकांच्या सूचनेनुसार विकासकामे करतो. नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आम्ही विकासकामे करत आहोत. आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. या भागातील अनेक लहान लहान गल्ल्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते आणि नाल्यांची, पाईप लाईन, लाईट ची कामे झाली आहेत. याभागात किती विकास कामे झाली आहेत हे स्थानिक नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. शहरात विकासकामे कोण करतं? शासन दरबारी पाठपुरावा करून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून शहरवासीयांना मूलभूत सुविधा देण्यासाठी कोण प्रयत्नशील असतं याचा विचार देखील नागरिकांनी करायला हवा. त्यामुळे भविष्यात काम करणाऱ्यांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलताना डॉ योगेश भैया म्हणाले की, विकासाची कामे ही टप्प्या टप्प्याने घ्यावी लागतात. त्यामुळे अशा कामांना वेळ लागतो. मात्र आता उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. ज्या प्रकारे मुख्य रस्त्याचे काम दर्जेदार झाले त्याच पद्धतीने अंतर्गत लहान लहान रस्त्यांची आणि नाल्यांची कामे दर्जेदारच होतील असे सांगितले. यावेळी ढगे कॉलनी, मिल्लत उर्दू सेमी इंग्लिश स्कूल येथे नगरसेवक मुखीद लाला, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमेर सलीम, शेख शाकेर, अमोल गलधर, आमेर सिद्दीकी, शुभम कातांगळे, ज्ञानेश्वर राऊत, दिपक चौघुले, गोरख काळे, सुनील गायकवाड, विठ्ठल गुजर, विक्रम चव्हाण, आमेर बागवान, शहादेव वंजारे, अनिस शेख, राजेंद्र कुसळकर, वाजेद कुरेशी, अशोक वीर, युनूस शेख यांची उपस्थिती होती. गजानन नगर येथे नगरसेवक सय्यद इलियास, विपुल गायकवाड, दत्ता गायकवाड, जयदत्त थोटे, माजी नगरसेवक अमोल पौळ, आरेफ खान, जिलानी बागवान, मुजीब ए.वन., विकास यादव, सफवान खान, बंडू निसर्गध, भागवत बादाडे, राहुल शिंदे, महादेव वाघमारे, सौ.संगीताताई वाघमारे, काशिफ चाऊस, वैद्यनाथ मसुरे, अंकुर गायकवाड, दादा जाधव, माजेद कुरेशी, समीर खान यांच्याशी स्थानिक नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिक्षक कॉलनी येथे ज्येष्ठ नगरसेवक सादेक जमा, सतिश पवार, नबिल जमा, साजेद जागीरदार, इकबाल भाऊ, अन्वर खान, फरदिन जागीरदार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.