बीड – पाच वर्षांपूर्वी या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले होते गोरगरीब रुग्णांची सेवा होवी कमी पैशात रुग्णांचा इलाज व्हावा याची आम्ही दक्षता घेतली हे पाहण्यासाठी आज आमची आई नाही याची मनात दुख आहे गोरगरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा असून पूर्वी कॅन्सरच्या इलाज साठी मुंबई पुण्याला जावं लागत असे पण आता जिल्ह्यातील रुग्णांना इलाज करीता बाहेर जाण्याची गरज नाही.असे वक्तव्य संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डीयाक युनिटच्या माध्यमातून बीडमध्ये स्व.रेखाताई क्षीरसागर कॅन्सर सेंटरचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
या युनिटचे उद्घाटन मा.सौ.दिपाताई मुधोळ मुंडे, जिल्हाधिकारी, बीड, मा.डॉ.श्री.सुरेशजी साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड यांच्या हस्ते संपन्न झाले.तर प्रमुख उपस्थिती मध्ये मा.श्री.नंदकुमारजी ठाकुर, पोलीस अधीक्षक, बीड, मा.आ.सय्यदजी सलीम साहेब, मा.श्री.कल्याण काका आखाडे, मा.श्री.अजितजी वरपे, कॅन्सर तज्ञ मा.श्री.डॉ.महेश काळे, मा.श्री.डॉ.आळने सर, मा.श्री.मदन जाधव सर, मा.श्री.वैजिनाथ नाना तांदळे, मा.श्री.पवार सर, सय्यद बशीर, काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डीयाक युनिटचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे म्हणाले आज बीड जिल्ह्यात कॅन्सर सारखे जीव घेणे आजारावर उपचार होत आहे. असे कॅन्सर उभा करणे खूप मोठी महत्त्वाची बाब असून याचे पूर्ण श्रेय आमदार संदीप क्षीरसागर यांना जाते.
बीडच्या तमाम रुग्णांना या दवाखान्याचा फायदा होत असून येणाऱ्या काळात आमदार संदीप भैया च्या माध्यमातून बीड शहरासाठी अनेक मोठे दवाखाने उभा राहतील यात शंका नाही आमदार माजी आमदार सय्यद सलीम भाई. रुग्णांना इलाज करण्याकरता खूप मोठा त्रास होतो हे लक्षात घेऊन मी बीडमध्ये येण्याचे निर्णय घेतला असून आपल्या जिल्ह्यात कॅन्सर आजारांपासून मुक्त करण्यासाठी बीडमध्ये येण्याचा निर्णय घेतला. रुग्णांना कमीत कमी खर्चात सेवा देणे हाच आमचा यामागचा उद्देश डॉ महेश काळे यांच्यासह संपादक अजित वर्पे ,कल्याण काका आखाडे, डॉक्टर साबळे सर, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, या मान्यवरांनी आपले अनमोल मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरसह शेकडोच्या संख्येने शेरवाशी उपस्थित होते