अधिकार्यांवर गुन्हे नोंद करण्यास होतोय विलंब!
याची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात यावी!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शासकीय कार्यालयात सुद्धा ही जयंती उत्साहात साजरी करण्यात येते परंतु बीड येथील महावितरण कार्यालयात चक्क येथील अधिक्षक निकम व येथील कर्मचार्यांनी पायात बूट घालून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवरायांचा अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करावे अशी तक्रार बीड शहर पोलीस ठाण्यात देवीसिंह शिंदे यांनी केले आहे. परंतु गुन्हे नोंद होण्यास विलंब होत असल्यामुळे शिवप्रेमीतुन नाराजगी व्यक्त होत आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यात नियमानुसार कारवाई करण्याची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य अठरापगड जातीतील गरजूंसाठी खर्ची घातले, ताट मानेने कसे जगायचे हे शिवरायांनी सर्वांना शिकवले त्याच शिवरायांची जयंती आपण 19 फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात साजरी करतो यावेळेस सुद्धा सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला परंतु बीड येथील महावितरण कार्यालयामध्ये चक्क येथील महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता निकम व इतर कर्मचाऱ्यांनी चक्क पायात बूट घालून राजेंना अभिवादन केले. या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्यात यावे यासाठी जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवीसिंह शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे परंतु गुन्हा नोंद करण्यास विलंब होत असल्यामुळे शिवप्रेमी मधून नाराजगी व्यक्त होत आहे. तरी पोलीस प्रशासनाने याची गंभिर दखल घेऊन याची सखोल चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे.