पासबाबत आम्हाला काहीच माहित नसल्याचे कर्मचार्यांचे मत।
संपर्कासाठी देण्यात आलेले नंबर फक्त नावालाच!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : उद्या पासुन जिल्ह्यात दहा दिवसाचे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यातुन अत्यावश्यक सेवांसाठी सवलत देण्यात आली असुन हे पासेस संबंधित तहसिल कार्यालयात देण्यात येणार आहेत. यामुळे आज सकाळ पासुन बीड तहसिल कार्यालयात पासेस साठी अनेक नागरिक जात आहेत. परंतु येथील कर्मचारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यासह याबाबत आम्हाला कोणतेही प्रशिक्षण दिले नाही, याची आम्हाला माहित नाही, आम्हाला वरिष्ठांकडुन कोणतीच माहिती मिळाली नाही यासह इतर उत्तर येथील कर्मचारी नागरिकांना देत आहेत. यासह संपर्कासाठी देण्यात आलेले नंबर तर फक्त नावालाच आहेत की काय अशी आवस्था बीड तहसिल कार्यालयाची झाली आहे. जिल्हाधिकारी साहेब खालील यंञणेवर नियंञण ठेवा नसता याचा सर्व सामान्यांना मोठा ञास सहन करावा लागेल. बीडचे तहसिलदार यांना फोन केला असता, फोन न घेतल्यामुळे त्यांचे मत समजु शकले नाही…