हि निवडणूक एकतर्फी; विक्रम काळेंवर शिक्षक प्रचंड नाराज
या निवडणूकीत काळेंना हाबाडा द्या — प्रदीप सोळूंके
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : मराठवाडा शिक्षक पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत असून या निवडणुकीमध्ये आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांना चक्क शिक्षक हाकलून देऊ लागल्याचे मत अपक्ष उमेदवार प्रदीप सोळंके यांनी आजच्या (ता. २७) पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. यासह ही निवडणूक एकतर्फी बनली असून यात माझा विजय नक्कीच होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या 14 वर्षापासून आमदार म्हणून वावरणारे विक्रम काळे यांनी मुळात शिक्षकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेले आहे. यामुळेच त्यांना अनेक ठिकाणी शिक्षकांकडून ना पसंती मिळत आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न असल्यामुळे व शिक्षकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे विक्रम काळेंवर बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शिक्षक प्रचंड नाराज असून त्यांना या निवडणुकीत या नाराजीचा सामना करावा लागणार आहे तर दुसरीकडे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असणारे प्रदीप सोळुंके यांना मात्र ठीक ठिकाणी शिक्षक पसंती देऊ लागले आहेत. आज त्यांनी बीड शहरांमध्ये पत्रकार परिषद घेतले यावेळी त्यांनी विक्रम काळे यांना शिक्षक ठिकठिकाणी कशाप्रकारे हाकलून देत आहेत व ही निवडणूक एकतर्फी बनली असून यात माझा विजय निश्चित होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला.