बीड प्रतिनिधी : महिला नायब तहसीलदार यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची आयोगाने घेतली गंभीर दखल जिल्ह्यातील केज येथील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भर रस्त्यावर हल्ला झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. याची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून शनिवारी महिला आयोगाच्या सदस्य अँड संगीता चव्हाण यांनी केज येथे जाऊन ना. तहसिलदार अशा वाघ यांची भेट घेऊन आरोपी विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देत वाघ यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की केज येथील नायक तहसीलदार आशा वाघ दुपारच्या वेळी जेवण करून तहसील कार्यालयाकडे जात असताना काही नातेवाईकांनी त्यांच्यावर भर रस्त्यात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये आशा वाघ यांच्या भावाच्या बायकोचा व इतर चार जणांचा समावेश आहे. हल्ला करणाऱ्या आरोपीमध्ये सुरेखा मधुकर वाघ, हरिदास मधुकर मवाले, मंजुबाई भास्कर मवाली व एक अनोळखी महिला व पुरुष या पाच जनाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
महिला वरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत-अँड संगीता चव्हाण
बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मागील महिनाभरात वाढत आहेत. याबाबत महिला आयोगाच्या बैठकीत विषय मांडणार आहे. यापुढे अशा प्रकारे महिलांवर अन्याय होत असेल तर सरकार व जिल्हा प्रशासन करते काय? असा सवाल महिला आयोगाच्या सदस्या अँड चव्हाण यांनी उपस्थित केला असून, यापुढे महिला वरील अन्याय अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत असेही चव्हाण म्हणाल्या.
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोरे
यांनी साधला आशा वाघ यांच्याशी संवाद….
भर दिवसा एका महिला अधिकाऱ्यावर अशाप्रकारे हल्ला होत असेल तर कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे काय? असा सवाल उपस्थित होतो. शनिवारी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोरे यांनी महिला आयोगाच्या सदस्या अँड संगीता चव्हाण थेट त्यांच्या घरी जाऊन आशा वाघ यांच्याशी संवाद साधला व विधान परिषद उपसभापती डॉ नीलम ताई गोरे संवाद साधला असता केज डी वाय एस पी पंकज कुमावत पी आय वाघमोडे याशिवाय पोलिसांना योग्य तपास करण्यासंदर्भात सूचना दिल्या.