स्थानिक शाखेची दमदार कामगिरी: पुढील तपास बीड ग्रामिण पोलीसांकडे
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : धुळे सोलापूर राष्ट्रीय मार्गावरील मांजरसुंबा घाटामध्ये गुरुवारी रात्री चार दरोडेखोरांनी एका व्यापाऱ्यास लुटले होते. व्यापाराच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्या होता. यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने यंत्रणा हलवत अवघ्या बारा तासात दरोडा टाकणाऱ्या टोळीला जेरबंद केले . ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ व त्यांच्या टीमने केले
सविस्तर माहिती अशी की, सय्यद ऐजास सय्यद पाशा (रा.बीबी ता.लोणार जि. बुलढाणा) हे व्यापारी द्राक्षाचा व्यवसाय करत असून ते गुरुवारी व्यवसायाच्या अनुषंगाने पीकअप ने बीबी ते सोलापूर जात असतांना त्यांना गुरुवारी (ता. १९) रात्री मांजरसुंबाघाटात चार जणांनी चारचाकी गाडी आडवी लावत चाकूचा धाक दाखवुन मोबाईल, पैशाची चोरी केली होती. व्यापार्याच्या तक्रारीवरुन ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर हा तपास गतीने करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने यंञणा कामाला लावली होती. स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दरोड्यातील आरोपी बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात आहेत. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले. विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा कबूल केला. ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये समाधान बाबुराम खिंडकर (रा. बेलवाडी), अविनाश भास्कर धाडे (रा. तिसगांववाडी ह.मु.पिंपळणेर ता. जि. बीड) शिवराज कल्याण गायकवाड (रा. नाळवंडीनाका बीड), लिंबाजी जगन्नाथ वरपे (रा.पिंपळनेर ता. जि. बीड), स्वप्नील महादेव वरपे (रा. शिवाजीनगर बीड) यांचा समावेश आहे. या आरोपींना बीड ग्रामिण पोलीसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास ग्रामिण पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उप पोलीस अधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ यांनी व पोउपनि भगतसींग दुलत, श्री रामदास तांदळे, श्री मनोज वाघ, श्री प्रसाद कदम, श्री विकास वाघमारे, श्री सोमनाथ गायकवाड, श्री अश्वीनकुमार सुरवसे, श्री अशोक कदम यांनी केली.