बीड प्रतिनिधी: बीड शहरात शासकीय आय टी आय मध्ये कोविडं सेंटरला रुग्णाचे हाल होत आहे असे उपचार घेऊन येणारे रुग्ण यांनी निरदर्शनास आणले आहे एकतर रुग्ण त्या भयाण कोरोनानी बेहाल आणी तेथील कर्मचारी व इंचार्ज डॉ अधिकारी यांची रुग्णांना अरे-तुरेची भाषा नुसता डोक्याला ताप त्यांच्या अशा वागण्या मुळे लवकर राहणारा आजार तिथे वाढतो असे तेथून उपचार घेऊन जाणारे रुग्ण म्हणतात पण डॉ इंचार्ज यांचे उदयोग चालेले आहेत ते बंद करा आणी रुग्णाची सेवा चांगली करा नाही तर बीड शहर शिवसेनेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी साहेब व डॉ C.S. साहेब यांना निवेदन देऊन जर नाही सुधारणा झाली तर आय टी आय कोविड सेंटर मध्ये जाऊन त्या रुग्नासाठी आम्हाला तो आजार झाला तरी चालेल पण तिथे स्पॉट पंचनामा करणार असे शिवसेनेचे बीड शहर प्रमुख सुनील सुरवसे यांनी पत्रकात नमूद केले…
बीडच्या आय टी आय सेंटर मध्ये रुग्णाची सोय होत नाही त्यामध्ये पिण्याचे पाणी, अंगोळीचे गरम पाणी,कच्चे जेवण,जोपण्याचे कपडे,कॉट,असे अनेक रुग्णाचे प्रश्न आहेत व कोविड सेंटर मध्ये या सर्वांचे गुत्तेदार ( ठेकेदार ) आहेत त्यांची माहिती व कोणते कुणाला टेंडर भेटले याची माहिती घेणार आहेत कारण रुग्णाची अवस्था जर अशी होत असेल तर आय टी आय कोविड सेंटर मध्ये मिली-भगत करून भरपूर घोळ आहे कोविड सेंटर मध्ये जे कर्मचारी व डॉ अधिकारी आहेत त्यांची लवकरात-लवकर त्यांच्यावर कार्यवाही करावी नसता बीड शहर शिवसेनेच्या वतीने कोविड सेंटर मध्ये जाऊन शिवसेना स्टाईल स्पॉट पंचनामा करण्यात येईल असे बीड शहर प्रमुख सुनील सुरवसे यांनी पत्रकात द्वारे कळविले