विविध प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री सावेंना निवेदन
बीड, प्रतिनिधी :- अलीकडच्या काळात बीड जिल्हा हा राज्यातील प्रमुख कापुस उत्पादक जिल्हा बनलेला आहे. यामुळे जिल्ह्यात शेतकर्यांच्या पांढर्या सोन्याला झळाली देणारा जिनिंग आणि प्रेसिंगचा व्यवसाय वाढला. परंतू शेती मला वर प्रक्रिया करणारा जिनिंग प्रेसींग धारकांना विद्युत खात्याच्या सावळ्या नियोजनामुळे अडचणीत आला आहे. जिनिंग धारकांचे हे प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी बीड जिल्हा जिनिंग अॅड प्रेसिंग असोशिएशनच्या वतीने पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन देण्यात आले.
बीड जिल्ह्यात कापसाचे उत्पादन अधिक असल्याने जिल्ह्यामध्ये शेतिमाला वर प्रक्रिया करणारा जिनिंग व ऑइल मिल उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. अनेक सुशिक्षीत बेरोजगार व नव उद्योजकांनी कर्ज काढून जिनिंग प्रेसिंग व ऑईल मिलचे उद्योग उभारले आहेत. या माध्यमातून हजारो बेरोजगारांना रोजगार उपलबध्द झाला आहे. बीड जिल्ह्यामध्ये उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत शेती असल्यामुळे शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी शेती मालावर जिल्ह्यातच प्रक्रिया होणे गरजेचे आहे. परंतू मागील काही दिवसापासून जिनिंगसाठी लागणारा उच्च दाबाचा विद्युत पुरवठा होत नाही. अनेकदा विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याने नियमित वीज मिळत नाही. यामुळे जिनिंग प्रेसिंग व ऑईल मिलचे उद्योगाचा उत्पादन खर्चात वाढत आहे. खरेतर महाराष्ट्र शासनाच्या वस्त्र उद्योग खाते तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडून जिनिंग व्यवसायासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विद्युत खात्याशी निगडित अनुदान देण्याच्या तरतुदी आहेत. परंतू बीड जिल्ह्यात जिनिंग अॅन्ड प्रेसिंगचा मोठा व्यवसाय असतानाही कित्तेकवेळ पाठपुरावा करूनही त्याचा लाभ अथवा अनुदान मिळत नाही. विद्युत खात्याशी कित्तेकदा पाठपुरवठा करून देखील सदरील अनुदान वेगवेगळे करणे सांगून देण्यात येत नाही. यामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेला जिनिंग व ऑइल मिल उद्योग अडचणीत सापडला आहे. हा उद्योग वाचवण्यासाठी पालकमंत्री यांनी सबंधितांना तात्काळ सुचना द्याव्यात असे निवेदन बीड जिल्हा जिनिंग अॅन्ड प्रेसिंग असोशिएशनच्या वतीने पालकमंत्री अतुल सावे यांना देण्यात आले. या वर्षी सी सी आय कडून खुल्या बाजारात कापूस खरेदी करण्यात येत असून या खरेदी मुळे शेतकऱ्यांना योग्य भाव तसेच मापात पाप होणार नाही परंतु
बाजार समितीने एक रुपया पच पैसे प्रती आहेकड्या प्रमाणे सेस दिल्या शिवाय खरेदी करू न दिल्यामुळे बिड तालुक्यात खरेदी केंद्र सुरु होऊ शकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्या बरोबरच जिंनिंग व्यवसायिक देखील मोठ्या नुकसानीत आला आहे. या संदर्भात जिनिंग ऑड प्रेसिंग असोसिएशन या संदर्भत मा ना अतुल सावे यांनी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री बीड जिल्हा यांना निवेदन देऊन तात्काळ पणन संचालकांशी चर्चा विनिमय करून मार्ग काढण्यासाठी विनंती केली आहे. माननीय पालक मंत्री यांनी या संदर्भात महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करतो असे आश्वासन दिले आहे.