बीड प्रतिनिधी – बीड मतदार संघातील पिंपळनेर ते बाबुळवाडी आणि बाबुळवाडी ते गुंदाआडगाव गाव या 7 किलोमीटर रस्त्यासाठी आणि नाळवंडी ते ढेकणमोहा 4 किलोमीटर रस्त्यासाठी एकूण 9 कोटी 64 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून या दोन रस्त्यांना मंजुरी मिळाली असून लवकच या रस्त्याचे काम सुरू होणार असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील अनेक गावचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत या दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये पिंपळनेर ते बाबुळवाडी आणि तिथून पुढे गुंदा- आडगाव पर्यंत 7 किलोमीटरचा रस्ता होणे आवश्यक होते तसेच नाळवंडी ते ढेकणमोहा या रस्त्याची देखील मागणी गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांनी केलेली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन हे रस्ते मंजूर करावेत अशी मागणी केली होती त्यानुसार पिंपळनेर ते गुंदा ते आडगाव या रस्त्यासाठी 6 कोटी 32 लक्ष रुपये आणि नाळवंडी ते ढेकणमोहा या 4 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी 32 लाख असे 9 कोटी 64 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही गावांच्या रस्त्याची समस्या सुटणार आहे