प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात आयपीएस पंकज कुमावत यांनी केज विभागामध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून पद्भार घेतल्यानंतर अवैध गुटखा, अवैध दारू, बायोडिझेल, वाळू उपसा यासह इतर दोन नंबर धंद्यावर मोठ्या कारवाया करत जिल्ह्यात पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली होती. यानंतर कार्यातून दाखविणारे पंकज कुमावत हे परत केज येथे रूजू झाले असून नव्या जोमाने काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या
कार्यकाळामध्ये जिल्हाभरात विविध कारवाया करत वर्दी काय असते हे दाखवून दिले होते त्यांना काही काळ ट्रेनिंगसाठी काही काळ जावे लागले होते. त्यांचा ट्रेनिंगचा काळ संपला असून आज गुरुवारी परत केज येथे पोलीस उपअधीक्षक पदाचा पद्भार घेतला आहे. त्यांनी पदभार घेताच दोन नंबर धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. एक आयपीएस अधिकारी काय करू शकतो हे त्यांच्या कार्यातून दाखविणारे पंकज कुमावत हे परत केज येथे रूजू झाले असून नव्या जोमाने काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जिल्हाभरात विविध कारवाया करत वर्दी काय असते हे दाखवून दिले होते. यामध्ये अवैध गुटखा, अवैध वाळूउपसा, बायोडिझेल, अवैध दारू, मटका यासह इतर अवैध धंद्यावर कारवाया करत गुन्हे नोंद केले होते. त्यांच्या या कारवायामुळे दोन नंबर धंदेवाल्यांना एक जरब बसली होती. पुढील ट्रेनिंगसाठी ते ट्रेनिंगला गेल्यामुळे केज पोलीस उपअधीक्षक पदाचा अतिरिक्त पद्भार बीडचे पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्याकडे देण्यात आला होता. पंकज कुमावत यांची ट्रेनिंग संपली असून त्यांनी आज परत केज पोलीस उपअधीक्षक पदाचा पद्भार स्विकारला.