मान्यवरांच्या हस्ते पारंपारिक ड्रेस डिझायनिंग स्पर्धेचे उद्घाटन; नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन उदगीरची विद्यार्थीनी कोमल वाघमारे प्रथम
बीड प्रतिनिधी :- तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीडच्या वतीने दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता राज्यस्तरीय ड्रेस डिझायनिंग स्पर्धेचे उद्घाटन गव्हरमेंट पॉलिटेक्निक कॉलेज,औरंगाबाद येथील डिपार्टमेंट ऑफ ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरच्या एचओडी ज्योती लकडे, कैलास कला निकेतन,बीडचे प्रा.श्रीराम पुरी, श्रेया बुटिकच्या प्रीती पवार,डॉ.प्रियांका रोडे, प्रभारी प्राचार्य विद्या अवघडे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यातील ४२ स्पर्धक राज्यस्तरीय ड्रेस डिझायनिंग स्पर्धेत सहभागी झाले होते. पारंपारिक ड्रेस डिझाईन स्पर्धेत साईज ८,१०,१२ च्या डमीवर ड्रेस प्रदर्शित करणे या स्पर्धसाठी विद्यार्थिनींनी रेडी टू वियर साडी, पेशवाई साडी, ब्राह्मणी साडी, कश्मीरी लूक, राजस्थानी, पंजाबी, मुगल कालीन पोशाख, टाय अँड डाय ड्रेसेस, गरारा पॅटर्न, पॅनल ड्रेस, क्रिएटिव्ह पैठणी साडी, धोती साडी, केरळा पेंटिंग अँड मिरर वर्क ड्रेस, घागरा चोली, राजस्थानी पेंटिंग, ख्रिश्चन लुक, हॅन्ड वर्क ब्रायडल घागरा इत्यादी प्रकारचे ड्रेसेस प्रदर्शनासाठी ठेवले होते. या स्पर्धेचे परीक्षक ज्योती लकडे, प्रा.श्रीराम पुरी,प्रीती पवार,डॉ.प्रियांका रोडे यांनी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ड्रेसेसचे परीक्षण केले. स्पर्धेत नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,उदगीरची विद्यार्थीनी कोमल महिंद्र वाघमारे ही प्रथम आली आहे तर द्वितीय क्रमांक तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड येथील विद्यार्थिनी कविता कांबडी,तृतीय साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन,अहमदनगर येथील विद्यार्थिनी सोनाली रमेश बालशी हीचा आला आहे. उत्तेजनार्थ क्रमांक इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी,औरंगाबादची विद्यार्थिनी आयशा रफिक पठाण हीचा आला आहे. पारंपारिक ड्रेस डिझाईन स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून या मुलींनी बाजी मारली आहे.या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेसाठी प्रभारी प्राचार्य विद्या अवघडे यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन श्वेता अवसरमल यांनी केले तर उपस्थितांचे आभार सय्यद शहाणा यांनी मानले.