बीड : तालुक्यातील मौजे.लिंबागणेश येथे दि.१८ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक २ मधिल ईव्हीएम मशिन मधिल सरपंच उमेदवार गणेश वाणी यांच्या “शिट्टी “चिन्हाच्या बटनावर फेव्हीक्विक टाकुन बटन बंद करण्यात आले होते. संबधित प्रकरणात सरपंच उमेदवार यांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली होती. त्यामुळे मशिन दिड तास मतदान बंद होते. या मतदान केंद्रांवर ईतर दोन केंद्रापेक्षा मतदान कमी झालेले असल्याने राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक २ चे फेरमतदान घेण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी आज. दि.२३ डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी साडे ७ वाजल्यापासून सायं साडे ५ वाजेपर्यंत अवधी असून आजच रात्री ८ वाजता आयटीआय बीड येथे मतमोजणीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
महिला व पुरूषांची तपासणी करून मतदान केंद्रात प्रवेश; कडेलोट पोलीस बंदोबस्त
दि.१८ डिसेंबर रोजी अनुचित प्रकार घडल्यानंतर लिंबागणेश येथील प्रभाग क्रमांक २ मध्ये मतदानापुर्वी महिला व पुरूषांची तपासणी करूनच मतदान केंद्रात प्रवेश दिला जात असून सपोनि नेकनुर पोलीस स्टेशन विलास हजारे तसेच पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव ठाण मांडून असुन कडेलोट पोलीस बंदोबस्त असुन सर्व प्रक्रीयेचे चित्रीकरण करण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्ये एकुण ८२९ मतदान असून दि.१८ डिसेंबर रोजी ५८८ मतदान झाले होते तर आज दि.२३ डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत ३०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.