शिरूर कासार, ता.
————-
दहा हाजार लोकसंख्या आसल्याल्या शहराला दुषित पाण्याचा पुरवठा तोही आठ ते दहा दिवसाला आर्ध तास होत आहे. त्या साठी तिन कोटीच्या दोन योजना राबविण्यात आल्या असल्या तरी शहरवासीयांचे पिण्याच्या पाण्या साठी हाजारो रूपये पाण्यात चालले आहेत.
शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रथम खटकळी येथील सिंचन विहीरी तुन पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली होती.त्या द्वरे शहराला पाणी पुरवठा करण्यात येत होता.पण शहराला तालुक्या बरोबर नगरपंचायतचा दर्जा मिळाल्याने झपाट्याने लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली गेली त्यामुळे प्रभागाचा विस्तार झाल्या ने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्या साठी नविन पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली त्या मधे तागडगाव येथील उथळा मध्यम प्रकल्पातुन सव्वादोन कोटीची महाजल पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. तसेच या मध्ये जलसुद्धीकरण केंद्रा बरोबर जलकुंभ ही उभारणी करण्यात आली होती.त्या मध्ये ही बरेच दिवसाचा कालखंड गेल्यावर योजना कार्यान्वीत झाली.त्या कालावधीत तालुक्यात दुष्काळ परीस्थिती निर्माण झाल्याने तीलाही पाणी कमतरता पडू लागल्याने नगरपंचायत ने
सिंदफणा प्रकल्पातुन ८० लाखांच्या पाणीपुरवठा योजने तात्काळ मंजुरी मिळून त्या द्धारे शहरातला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. आस्या प्रकारे दोन योजना शहरातील नागरिकांना पाण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत.
पण सध्या खटकळी येथील योजना काही तांत्रिक आडचनीत आडकली आसल्याने तीचा पाणीपुरवठा बंद आहे.तर सिंदफणा प्रकल्पातील योजना ही बंद आसल्याने तागडगाव येथील उथळा प्रकल्पातील योजना शहरातील नागरिकांना पाण्यासाठी उपलब्ध झाली आहे.पण या योजनेतून थेट नागरिकांना पिवळे व गढूळ पाणी आठ दहा दिवसाला आर्ध तास पुरवठा करण्यात येत आहे.या दूषित पाणी सोडण्यात येत आसल्याने शहरातील नागरिकांना किडण्या बरोबर साथीचे आजार निर्माण झाले आहेत. तसेच काही नागरिक पिण्याची पाणी दररोज विकत घेत आसल्यने पाण्या साठी हाजारो रूपये पाण्या साठी खर्च होत आहे.
—————–
शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्या साठी नविन जलसुद्धी केंद्रा बरोबर तिन लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाची उभारणी करण्यात करीता एक कोटी दहा लक्ष रू निधी चा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याची मंजुरी आंतिम टप्प्यांत आली आहे.
– किशोर सानप
मुख्याधिकारी नगरपंचायत शिरूर कासार
————————————–
शहरातील नागरिकांना नगरपंचायत दहा दिवसा ला पिवळे,गढूळ पाणी पुरवठा करते तेही आपुरे मिळत आसल्याने नगरपंचायत च्या गलथान कारभारा मुळे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
– सुनिल पांडूरंग गाडेकर नागरिक
शिरूर कासार
—————