दुपारपर्यंत ३० पैकी १९ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला
अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांनी केले नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे अभिनंदन
गेवराई प्रतिनिधी : गेवराई विधानसभा मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयी सलामी दिली असून महत्वाची समजली जाणारी वडगाव ढोक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून या ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा वर्चस्व सिद्ध केले. अमरसिंह पंडित पुरस्कृत पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले सरपंच पदासाठी सौ.आशाबाई भास्कर ढाकणे या विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर मालेगाव, टाकळगव्हाण, पांचाळेश्वर, माटेगाव, कुंभेजळगाव, बोरिपिंपळगाव, ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणिस अमरसिंह पंडित, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी अभिनंदन केले. सर्व विजयी सरपंच, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी कृष्णाई येथे विजयी जल्लोष केला. ग्रामपंचायत तो झॉंकी है जि.प. पं. स. आणि विधानसभा और बाकी है … अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तिसऱ्या फेरी अखेर ३० पैकी १९ ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्चस्व सिद्ध केले असून ग्रामीण मतदारांचा कौल माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या बाजूने आला असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रंचड उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघात रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजता पंचायत समिती येथे दहा टेबलावर एकूण नऊ फेरीत सुरु आहे. सकाळी दहा वाजता दहा टेबलावर पहिल्या फेरीत वडगाव ढोक ची मतमोजणी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयी सलामी दिली. एकुणच गेवराई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीमय झाला आहे. वडगाव ढोक ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून सौ.आशाबाई भास्कर ढाकणे, खडकी टाकळगव्हाण सरपंचपदी सौ. मनिषा बाळासाहेब साठे, मालेगाव (बु) च्या ग्रामपंचायतीवर बबन गणपती गोरकर , खडकी टाकळगव्हाण ग्रामपंचायतीवर
सौ. मनिषा बाळासाहेब साठे, माटेगाव ग्रामपंचायतीवर ज्ञानेश्वर आरबड, धानोरा ग्रामपंचायतीवर अविनाश बाबुराव राऊत सरपंच पदासाठी विजयी झाले.
दुपार पर्यंत आलेल्या निकालानुसार गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या फेरीत वडगाव ढोक ( सरपंचपदी सौ.आशाबाई ढाकणे विजयी), टाकळगव्हाण( सरपंचपदी सौ.मनिषा साठे विजयी) काजळा, मालेगांव बू, (सरपंच पदासाठी बबन गोरकर विजयी), पांचाळेश्वर, कूंभेजळगाव ग्रामपंचायतीवर अमरसिंह पंडित गटाने वर्चस्व सिद्ध केले आहे.
दुसरी फेरी संपली तेंव्हा दहा पैकी आठ ग्राम पंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला सुशी (सरपंच पदी शशिकला कांबळे )सैदापुर , बोरी पिंपळगाव, माटेगाव(ज्ञानेश्वर आरबड) मिरगाव , राजापुर, धानोरा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे वर्चस्व सिद्ध झाले.
तिसरी फेरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गाजवली रांजणी, हिवरवाडी, बोरगाव बू, सावळेश्वर, मनुबाई जवळा, सिरसदेवी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच आणि सदस्य विजयी झाले. कार्यकर्त्यांनी वाजत गाजत येऊन कृष्णाईवर विजयी जल्लोष केला.
दरम्यान मतमोजणीच्या प्रारंभीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयी मुसंडी मारली आणि भाजपा सेनेचा धुव्वा उडाला. कृष्णाई निवासस्थानी विजयी उमेदवार जल्लोष करत असून माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, युवानेते पृथ्वीराज पंडित रणविर पंडित यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. उर्वरित ग्रामपंचायतीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व सिद्ध होईल असा विश्वास अमरसिंह पंडित यांनी यावेळी व्यक्त केला.