बीड प्रतिनिधी : व्यापाऱ्यांच्या हितासाठी सत्यनारायण लाहोटी यांनी कणखर भूमिका घेऊन शासन दरबारी प्रश्न मांडत ते सोडवून घेतले, मनशक्ती कणखर असेल व संघर्षाची तयारी असेल तर आयुष्याचा प्रवास सुखकर होतो सत्यनारायण लाहोटी यांनी व्यापाऱ्यांसाठी केलेले कार्य हे पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे
बीड येथील सामाजिक धार्मिक शैक्षणिक व व्यवसाय उद्योगातील अद्वितीय व्यक्तिमत्व सत्यनारायण लाहोटी यांच्या ७५ अमृत महोत्सवानिमित्त आज गौरव समितीच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे होते. यावेळी श्रीक्षेत्र चाकरवाडी संस्थान चे ह.भ. प. महादेव महाराज चाकरवाडीकर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार प्रीतमताई मुंडे, उद्योजक राम भोगले,यांच्यासह राज्यभरातील मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाली की आज 75 वर्षानिमित्त अमृत महोत्सव साजरा होतोय त्याचबरोबर आपल्या देशाचाही आज अमृत महोत्सव आहे हा दुग्ध शर्करा योग असून सामान्य कुटुंबातून असामान्य व्यक्ती महत्त्व निर्माण झालेले सत्यनारायण लाहोटी यांच्या जीवनाचा वाढता आलेख लक्षात घेता त्यांनी केलेला संघर्ष लक्षात घेण्यासारखा आहे विविध क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा करत व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत वैयक्तिक स्वार्थ न पाहता संघटित होऊन प्रश्न सोडवले आणि आपल्या समन्वय व संघर्षाची भूमिका घेत व्यापारी हिताचे काम केले आहे मनशक्ती कणखर असेल व संघर्षाची तयारी असेल तर आयुष्याचा प्रवास सुखकर होतो सामाजिक प्रश्नासाठी स्वतःला झोकून देऊन काम केले तर त्याची निश्चित दखल घेतली जाते आपण वयस्कर झाले असले तरी अजून आपण कणखर आहात आपल्या कार्याने सार्वजनिक हिताचे निर्णय मार्गी लागत आहेत हीच मोठी सेवा आहे व्यासपीठावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री उपस्थित असल्यामुळे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मराठवाड्याचे प्रश्नावर भाष्य केले मराठवाड्याच्या पाणी प्रश्न संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की पश्चिम वाहिन्या नद्यांचे वाया जाणारे पाणी जर मराठवाड्याला मिळाले तर पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि ही योजना आता लवकरच कार्यान्वित होईल अशी आशा आहे यासाठी मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आपण सातत्याने या प्रश्नावर मागणी करत आलो आहोत त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिक शाखांची आवश्यकता असून शाखा कमी असल्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांच्या या मागणीचा निश्चित विचार करून शाखा वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळी प्रास्ताविक मानसिंग पवार यांनी तर आभार सुरेश लड्डा यांनी मानले,सन्मानपत्र वाचन राजेंद्र मुनोत यांनी केले यावेळी राज्यातून जिल्ह्यातून व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते