जातेगावचा संघ विजेता तर रामपुरीचा संघ उपविजेता
गेवराई प्रतिनिधी : जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित क्रिडा महोत्सवात गेवराई येथे सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवात मुलींच्या कब्बडीचा अंतिम सामना जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेचे सचिव जयसिंग पंडित यांच्या उपस्थितीत रंगला. या सामन्यात यमादेवी विद्यालयाच्या संघाने माध्यमिक विद्यालय रामपुरी संघाचा पराभव करत विजय मिळवला. जयसिंग पंडित यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
क्रिडा महोत्सवात गेवराई येथील शारदा विद्यामंदिराच्या मैदानवर १७ वर्ष गटात मुलींच्या कब्बडी स्पर्धा संपन्न झाल्या. सर्व साखळी सामन्यानंतर अंतीम सामना यमादेवी विद्यालय विरुद्ध माध्यमिक विद्यालय रामपुरी यांच्यात झाला. दोन्ही संघांने चांगली कामगिरी करत एकमेकांना शेवटपर्यंत झुंज दिली. अटीतटीच्या लढतीत यमादेवीच्या संघांने बाजी मारली. संघातील प्रतिक्षा राठोड , आरती आर्दड, सुजाता ढेरे, प्रतिक्षा सुरवसे, पायल राठोड, सीमा राठोड, धनेश्वरी धापसे या खेळाडूंनी चांगली खेळी करून संघासाठी विजय खेचुन आणला. माध्यमिक विद्यालय रामपुरी शाळेच्या सारिका तौर, राजनंदिनी तौर, पल्लवी मस्के, दिपाली चोपडे, गौरी गोरे, ज्ञानेश्वरी पवार या मुलींनी जातेगाव संघाबरोबर निकराचा लढा दिला. अखेर रामपुरीचा संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेचे पंच म्हणून शुभम कादे, गणेश यादव, गणेश नवले यांनी काम पाहिले तर गुणलेखक म्हणून आदित्य शिंदे, नवनाथ चव्हाण, राज शिंदे, पवन खांडे, बंटी संदीप, स्वदिप डाके यांनी काम पाहिले.
अंतिम सामना संपल्यानंतर विजयी संघाने विजयी जल्लोष केला. जयसिंग पंडित यांनी सर्व संघाचे अभिनंदन करु पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी स्पर्धांचे आयोजक रणवीर पंडित, दीपक आतकरे, गुफरान इनामदार, शाम रुकर, संदीप मडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजय अपसिंगेकर, विजय जाहेर, डॉ.केतन गायकवाड, शारदा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, क्रिडा शिक्षक, विद्यार्थी खेळाडू आणि क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.