एफडीआयएफ जवानांनी प्रत्यक्ष प्रात्याक्षिकांव्दारे आपत्ती प्रशिक्षणात दिली माहिती
बीड :- जिल्ह्यात उद्भवणार्या विविध आपत्तीच्या मुकाबला करण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त असून प्रशिक्षणामुळे आलेल्या आपत्तीला आपण चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. संबंधितानीा व पोलीस , अग्नीशमन दलाचे कर्मचारी, जास्तीत जास्त अधिकारी, कर्मचारी यांनी याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी या प्रसंगी केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री शर्मा बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्री.सचिन पांडकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, एफडीआरएफचे कमांडींग अधिकारी श्री.सुशांतकुमार विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनात काम करणारे पोलीस कर्मचारी,होमगार्ड, आग्नीशमन दलाचे व संबधीत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रात्याक्षिकांव्दारे उपस्थित विविध विभागातील अधिकारी कर्मचा-यानां आपत्ती प्रशिक्षणाद्वारे माहिती देण्यात आली. पूर परिस्थिती, आग लागल्यास, भुकंप, रस्ते अपघात, घरातील व्यक्तीस हार्टॲटक आल्यास या आपत्तीमध्ये अडकल्यास शोध व बचाव कार्य कसे करावे यासंबधी राष्ट्रीय अपत्ती मोचन बल (NDRF) पुणे येथील तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी यांनी दुरदृश्य प्रणालीव्दारे तसेच प्रत्यक्ष प्रत्याक्षिकांव्दारे धोक्यापासून बचाव कसा करावा हे सांगण्यात आले.
या प्रशिक्षणात राष्ट्रीय आपदा मोचन बल 5 वी वाहिनी पुणेचे अधिकारी सुशांतकुमार यांनी सविस्तर माहिती दिली. आपत्तीच्यावेळी श्वान मदत, गोताखोर प्रशिक्षण, हेलीकॉप्टर प्रशिक्षण, बर्फ पडतांना, आग लागल्यानंतर कशी काळजी घ्यावी, याबद्दल ए. बी. सी. डी. ई. याव्दारे ए आग लागल्यनंतर राख होणा-या वस्तु कागद, लाकूड, कपडे, बी लिक्वीड पेट्रोल, रॉकेल, गॅस, डीझल , सी मेटल, ई इलेक्ट्रानिक आग शॉट सर्कीटने आग अशा प्रकारे वस्तुंची माहिती दिली.
यामध्ये शाळेमध्ये अचानक आग लागली तर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी बॅग डोक्यावर घेऊन कमी हवेच्या, कमी ज्वाला असलेल्या भागाकडून बाहेर पडावे, जास्त धूर झाला असेल व्यक्ती बेशुध्द झाला असेल उपस्थित दोन व्यक्तीनी कशप्रकारे त्याला बाहेर न्यावे, पाण्यात बुडालेल्या व्यक्तीच्या नाका तोडांत पाणी गेले असेल तर त्याला खांद्यावर टाकून बाहेर न्यावे, मार लागून जखमी, बेशुध्द झालेला व्यक्तीला, पोटात, छातीत गज किंवा सुरी घुसून बेशुध्द अवस्थेतील जखमींना वेळेवर स्टेचर उपलब्ध नसते अशावेळी घरात असलेले ब्लँकेट, टी शर्ट, खताच्या गोण्या याचे बांबुच्या सहाय्याने स्टेचर बनवुन त्यांना दवाखान्यापर्यंत कसे न्यावे, हाताला मार लागला असेल तर तो खाली मोकळा न सोडता योग्य प्रकारे कपडा बांधून डोक्याच्या वर धरावे म्हणजे रक्तस्त्राव होणार नाही, डोक्याला मार लागला असेल तेव्हा डोक्यावर जवळ उपलब्ध स्वच्छ कपडयांनी गोल बांधावे तो कपडा गळयात अडकवू नये असे उपाय आणि सावधगिरीच्या बाबी दाखविण्यात आली
तसेच घरात हिंवा घराबाहेर इतर ठिकाणी व्यक्तीला हार्टॲटक आला असेल तर दुस-या व्यक्तीने त्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला बसून त्याच्या छातीवर 5 मिनिटात जोर जोरात 30 वेळा पंपींग करावे, लाहन मुलास असे झाले तर त्याच्या वयाप्रमाणे असेच हलक्या प्रमाणत छातीवर पंपीग करावे. अशा अचानक उद्भभवलेल्या आपत्तीमुळे आपण जवळ काही नसल्याने घाबरुन जातो अशा वेळी घाबरुन न जाता कशाप्रकारे आपण त्या आपत्तीग्रस्तांचे आपल्या जवळील उपलब्ध वस्तुने, सहकार्याने त्यांचे प्राण वाचवू शकतो या अनुषंगाने स्वत: प्रात्याक्षिकांव्दारे करुन दाखविली.
प्रशिक्षणात सुरुवातीला प्रस्तावना करताना निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी या प्रशिक्षणामुळे होणारे फायदे व उपयुक्तता याविषयी माहिती दिली, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या कार्याबाबत माहिती दिली.
*आपत्ती व्यवस्थापन साहित्य सामग्रीची प्रदर्शनी व बिंदूसरा धरण येथे पूरस्थितीमधील बचाव कार्याची तालीम*
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर मांडण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन आणि
बचाव कार्यासाठी साहित्य सामग्री व वस्तुंची मांडणी करण्यात आली होती त्याची पाहणी करुन जिल्हाधिकारी आणि उपस्थित अधिकारी यांनी त्यासंबधी माहिती घेतली.
बिंदूसरा नदी वरील पाली येथे असलेल्या धरणातील पाण्यात एफडीआयएफ जवानांनी जिवीत रक्षणासाठी केल्या जाणार्या कार्याची रंगीत तालीम दाखवली. यासाठी मोटार बोटी व बचाव कार्यासाठी असलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला.