बीड प्रतिनिधी ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर घरकुलच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या पारधी समाजातील अप्पा पवार यांचा न्यायाच्या प्रतीक्षेतच निष्क्रिय प्रशासन आणि बेजबाबदार जिल्हाधिकारी यांच्या गलथन कारभारामुळे मृत्यू झाला या संदर्भात विविध पक्ष संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन करून चर्चा करण्यात आली.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर मागील अनेक वर्षापासून घरकुलाच्या मागणीसाठी आप्पा पवार त्यांचा परिवार व इतर पारधी समाजातील लोक उपोणास बसले होते त्यांची मागणी फक्त राहण्यासाठी हक्काचं घर हवे एवढीच होती. आणि ते ती मागणी लोकशाही मार्गाने सरकारच्या दरबारी करत होते परंतु गेंड्याची कातडे असणारे प्रशासन बेजबाबदार जिल्हाधिकारी यांच्या चुकीमुळे अप्पा पवार यांचा मृत्यू झाला ही बाब माणुसकीला काळिमा फसणारी आहे मेल्यावरच न्याय मिळणार असेल तर सरकारच्या दारात येऊन आत्महत्या करायच्या का अशी अवस्था प्रशासनाने निर्माण केल्या मुळे न्याय मागायचा किणाकडे असा प्रश्न उपस्थित झाला आहे या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करत आप्पा पवार यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या वर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना व पक्षांच्या वतीने बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांना निवेदन देऊन आप्पा पवार यांच्या कुटुंबांला तात्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी लावून धरली व भिल्ल पारधी व आदिवासी त्यांच्या समस्यांचा पाढाच संगमेश्वर आंधळकर, राजेश शिंदे, गणेश मस्के यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर वाचून दाखवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी समरात्मक प्रतिसाद दर्शवत प्रकरणाची चौकशी करून संबंधित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळवून देण्याची हमी दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर आंधळकर, संविधान युवा मंचचे अध्यक्ष राजेश शिंदे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश मस्के, ऍड. गणेश कारंडे, काँग्रेसचे श्याम जाधव, रमेश सानप, भाकप चे दत्ता भोसले, कबिर जाधव, ऍड. बी एस यादव या सह कार्यकर्ते उपस्थित होते.