गेवराई प्रतिनिधी – आपआपसांतील हेवे-दावे आणि गट-तट बाजूला सारून ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी एकत्र या, ही निवडणुक कार्यकर्त्यांची असल्याने एका विचाराने लढून राष्ट्रवादीचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकवा असे आवाहन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. एरंडगाव, खांडवी, खांडवी तांडा, लुखामसला व किनगाव येथील भाजपा-सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या प्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सर्व कार्यकर्त्यांचे यावेळी स्वागत केले.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत गेवराई तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु झाली आहे. तालुक्यातील एरंडगाव येथील शिवसंग्रामचे माजी तालुकाप्रमुख दत्ता जाधव, किनगाव येथील रामप्रसाद चाळक, खांडवी येथील भाजपचे उत्तम भोले, लुखामसला येथील शिवसेनेचे बंडू शिंदे, खांडवी तांडा येथील भाजपचे माजी ग्रा.पं.सदस्य रामराव चव्हाण यांच्यासह आदींनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहिर प्रवेश केला. माजी आमदार अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांचे हात बळकट करण्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत.
एरंडगाव येथील शिवसंग्रामचे माजी तालुकाप्रमुख दत्ता जाधव, सुग्रीव लाखे, योगेश शिंदे, बंडू रानमहर आदींनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसंग्रामला सोडचिट्ठी देत माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी माजी सरपंच ईमु पटेल, अमोल डरफे, बळीराम साबळे, विजस चौधरी, बप्पासाहेब लाखे, सतिष लाखे, भागवत लाखे, रामनाथ लाखे, अभिजित लाखे, सुमंत लाखे, सोमनाथ लाखे, ओमप्रकाश लाखे, रामनाथ लाखे, अक्षय गाडे, जीवन लाखे, सतिष लाखे, अर्जुन कौठेकर, संजय लाखे, राजेंद्र राममहर, विलास लाखे, महादेव लाखे, मनोहर लाखे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खांडवी येथील भाजपाचे उत्तम भोले, अशोक भोले, राहुल कोकाटे, अविनाश भोले, अनिल भोले, बाबासाहेब भोले, सोहेल जावळे, नारायण कोकाटे, ग्रा.स. शिवाजी चव्हाण, अंकुश चव्हाण आदींसह खांडवी तांडा येथील भाजपाचे माजी ग्रा.पं.सदस्य रामराव चव्हाण यांच्यासह बाबासाहेब आडे, सोमनाथ शेजुळ, धनसिंग चव्हाण, विष्णू आलू चव्हाण, कृष्णा आडे, संतोष आडे, रविंद्र चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, शेषेराव राठोड आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी जय भवानीचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, चेअरमन अशोक नाईकवाडे, गंगाभीषण नाईकवाडे, गोपाळ शिंदे, भागवत कोल्हे, सुखदेव राठोड, लहू भोले, अण्णासाहेब भोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लुखामसला येथील शिवसेनेचे बंडू शिंदे, भानुदास पौळ, भारत थोरात, अविनाश काळे, गणेश शिंदे, मोहन माळी, सुरेश बरगे आदींनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी रावसाहेब काळे, विक्रम नलभे, अशोक पिंगळे, गजानन काळे, वैजीनाथ नलभे, अंकुश सरगर, बाप्पासाहेब पारेकर, गोविंद बरगे, श्याम शिंदे, वसंत व्हरकटे, रामकीसन थोरात, रामेश्वर काळे यांच्यासह आदी उपस्थित होते.
किनगाव येथिल भाजप-सेनेचे रामप्रसाद चाळक, विलास चाळक,महेश चाळक,बाळू चाळक,गणेश चाळक आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी बंडू आणा चाळक, तात्यासाहेब चाळक,परमेश्वर चाळक, महारुद्र चाळक आदी उपस्थित होते. सर्वांनी एकविचाराने काम करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा असे आवाहन करत अमरसिंह पंडित यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.