अत्यंत चुरशीच्या सामन्यात जयभवानीचा मुलींचा संघ विजयी
गेवराई प्रतिनिधी : जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेद्वारा आयोजित क्रीडा महोत्सवात आज माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या उपस्थितीत मुलींच्या गटात खो-खो चा अंतिम सामना रंगला. जयभवानी विद्यालयाच्या संघ दोन गुणाने विजय मिळवत विजेता तर माध्यमिक विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. सर्व खेळाडूंचे शिवाजीराव ( दादा) पंडित, शारदा ॲकॅडमीचे संचालक रणवीर पंडित यांनी अभिनंदन केले. यावेळी जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कुमारराव ढाकणे, श्रीराम आरगडे, बळीराम चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेद्वारा आयोजित क्रीडा महोत्सवात आज संस्थेच्या सर्व विद्यालयाच्या मुलींच्या गटात खो-खो चे सामने रंगले. दिवसभरात झालेल्या साखळी सामन्यानंतर अंतीम सामना जयभवानी विद्यालय गढी आणि माध्यमिक विद्यालय पाचेगाव यांच्यात खो-खो चा अंतीम सामना खेळला गेला. जयभवानी विद्यालयाच्या विद्या पवार, वैष्णवी आंधळे, ज्योती तागड, अश्विनी येवले या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विज मिळवला तर माध्यमिक विद्यालय पाचेगाव च्या खेळाडू सुषमा चव्हाण, स्वाती चव्हाण, शितल राठोड, दिव्या चव्हाण यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पराजय रोखन्याचा प्रयत्न केला.
गढीच्या संघाला देविदास गिरी, विजय अपसिंगेकर, आकाश आडे, गणपत डोंगरे यांनी मार्गदर्शन केले तर पाचेगाव विद्यालयाच्या संघाला चंद्रकांत नवपुते, सुनील बांगर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेत पंच म्हणून विजय जाहेर आणि विष्णू घोंगडे यांनी काम पाहीले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत १४ -१२ असे गुणवत मिळवत जयभवानीचा संघ दोन गुणाने विजयी झाला. विजयी संघांचे सर्वांनी विजयी जल्लोष करत अभिनंदन केले.
स्पर्धे यशस्वी करण्यासाठी रणवीर पंडित यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, प्रा.काशिनाथ गोगुले, मुख्याध्यापक वसंत राठोड, उपमुख्याध्यापक रणजित सानप, पर्यवेक्षक गायकवाड के.एन., मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे, राजेंद्र घुंबार्डे, किशोर पंडित, भक्तराज पौळ, अशोक तौर, सय्यद युनुस, भाऊसाहेब आडाळे, बाबुराव टकले, प्रा. सतिश चव्हाण, गंगाधर बोर्डे, शिवाजी पाटोळे यांच्यासह सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व विद्यार्थी, क्रिडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रिडा महोत्सवात आज मुलांच्या खो-खो स्पर्धा चालू आहेत. रणवीर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आजचे सामने रंगले आहेत. जयभवानीच्या मैदानावर क्रिडा जल्लोष सुरु आहे. या स्पर्धा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे.