–घरकुलासाठी मृत्यू झालेल्या कुटंबाला न्याय देण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ नाही
–नेत्यांच्या मनमानीमुळे सर्वसामान्यांना न्याय मिळेनाप्रारंभ वृत्तसेवा
बीड : घरकुलाच्या प्रलंबित प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या आप्पाराव पवार (वय 53) यांचा रविवारी (ता. चार) दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली. परंतू पालकमंत्र्यांना या घटनेचे काहीच देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुतनीचे लग्न बीड शहरात मोठ्या थाटात संपन्न झाले. या शुभकार्यासाठी पालकमंत्री यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. पण घरकुलासाठी ज्या पवार परिवारातील एकाचा मृत्यू झाला त्यांना मात्र भेटण्यासाठी पालकमंत्री यांना वेळ नव्हता. ज्या प्रकारे पदाधिकाऱ्यांच्या शुभकार्यासाठी नेते वेळ काढतात, त्याच प्रकारे सर्व सामान्यांच्या दु:खात वेळ का काढत नाहीत. निवडणूकांच्या दरम्यान ह्याच सर्वसामान्यांच्या घरी जेवण्याचे शोंग फक्त फोटो शुट साठी असते का? जिल्ह्यात सध्या नेते व प्रशासनाचा ताळमेळ नसल्यामुळे यांचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
बीड जिल्ह्यात आज पर्यंत अनेक नेते घडले, परंतू आज पर्यंत बीड जिल्ह्याचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. बीड जिल्ह्यातील सहा ते सात लाख ऊसतोड बांधव प्रत्येक वर्षी पोटाची खळगी भरण्यासाठी पर जिल्ह्यात, पर राज्यात जाऊन उसतोडणीचे काम करतात. यासह जिल्ह्यातील युवक वर्ग सुद्धा आता कामाच्या शोधात मोठ्या शहरात जाऊन काम करत आहे. बीड जिल्ह्यात विविध समस्या सर्वसामान्यांना भेडसावत असतात, परंतू याकडे मात्र सत्ताधारी नेते दुर्लक्ष करताना दिसतात. बीड तालुक्यातील पवार कुटूंब घरकुलासाठी गेल्या चार वर्षापासून प्रशासनाच्या दारात चक्करा मारत आहेत. परंतू त्यांचा प्रलंबित प्रश्न आज पर्यंत मार्गी लागलेला नाही. रविवारी या कुटूंबातील प्रमुख आप्पाराव पवार यांचे उपोषणा दरम्यान निधन झाले. निधन झाले सकाळी आठ वाजता व प्रशासन आले साडे दहा वाजता, म्हणजे सर्व सामान्यांच्या जीवाची परवा कोणालाच राहीली नसल्याचे कालच्या प्रकरणावरुन दिसून आले. पालकमंत्री सत्तेत असून सुद्धा म्हणावे असे लक्ष जिल्ह्यात देताना दिसत नाहीत. रविवारी (ता. चार) भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुतनीचा विवाह सोहळा शहरात मोठ्या थाटात संपन्न झाला या विवाह सोहळ्यास पालकमंत्री अतुल सावे यांची विशेष वेळ काढून उपस्थित राहीले होते. पदाधिकाऱ्यांच्या शुभकार्यास उपस्थित राहीलेही पाहीजे पण ज्या मतदारांनी आपल्याला निवडूण दिले त्यांच्या दु;खात सुद्धा उपस्थित राहून त्यांच्या समस्यांची विचारपुस करण्याची गरज असते. परंतू पालकमंत्री यांना त्यांच्या कामाचा विसर पडल्याचे त्यांच्या कामकाजावरुन दिसून येत आहे. घरकुलासाठी उपोषणा दरम्यान जीव गेलेल्या पवार कुटूंबाला पालकमंत्री व खासदारांनी न्याय देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. खासदार प्रितम मुंडे यांनी यात पुढाकार घेण्याची गरज आहे