नदीपात्रात ठिय्या आंदोलन करणार माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
beed : नागरिकांचे करोडो रुपये खर्च करून वाकिंग ट्रॅक बनवलेला रोड झाला कचरा ट्रॅक यामध्ये बीड नगरपालिका ही सामील बीड शहरातील भुयारी गटार योजना ही भ्रष्टाचाराची भेट सर्व शहरातील घाण पाणी नदीपात्रात आणून सोडले.
बीड शहरांमधून सुंदर बिंदुसरा नदी आहे बीड शहराजवळच असलेल्या जिरेवाडी या गावाजवळ बिंदुसरा नदीपात्रात मृत माशांचा थर आढळून आला हे सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले असून हे मृत मासे फक्त बीड शहरातील विषारी पाणी घाण पाणी डायरेक्ट त्या नदीपात्रामध्ये सोडल्यामुळे या माशांचा मृत्यू झाला हेच पाणी वाहत माजलगाव प्रकल्पामध्ये प्रकल्पामध्ये जाऊन वापस बीड शहरवासीयांना पिण्यासाठी येते या घाण पाण्यामुळे आज माशांचा मृत्यू झाला उद्या माणसांचा झाल्याशिवाय राहणार नाही बीड शहरातील सुभाष रोड व मोंढा रोड ला जोडण्यासाठी नदीपात्रातून वीस फुटाचा रोड करून त्या रोडवरती लाखो करोडो रुपये खर्च करून त्याला वॉकिंग ट्रॅक म्हणून घोषित करण्यात आले परंतु हा रोड वॉकिंग ट्रॅक नसून हा नुसता कचरा ट्रेक झालेला आहे याच कचऱ्याच्या नावावर आज बिंदुसरा नदी गळचे पी करून तेथील भूमाफियांच्या घशात घालण्याचे काम नगरपालिकेच्या मार्फत चालू आहे त्याच ठिकाणी वीस फुटाचा हा रस्ता आज भूमाप यांना फायदा पोहोचवण्यासाठी शहरातील सर्व रॉ मटेरियल टाकून 60 ते 100 फुटाचा बनवण्यात आलेला आहे याकडे सर्व नगरपालिका बघायची भूमिका घेत आहे कारण यामागे वर्षानुवर्ष सत्ता करणारे शहराला स्वप्न दाखवणारे भूमाफिया नेते सहभागी असल्यामुळे नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे या गोष्टीला घेऊन आम आदमी पार्टी प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे. पाठीमागे लाखो करोडो रुपये खर्च करून भुयारी गटार योजना बनवण्यात आली. ही गटार योजना नुसती नावालाच राहिलेली असून सर्व बीड शहरातील नालीचे पाणी सरळ नदीपात्रात सोडण्यात आल्या असून या भुयारी गटार योजनेची देखील यासाठी मार्फत चौकशी झाली पाहिजे बीड शहरातील सर्व नगरपालिकांच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या याच वॉकिंग ट्रॅक वरती येऊन कचरा शिफ्ट करतात त्यातील अर्धा कचरा हा नदीपात्रामध्ये टाकला जातो याच ठिकाणी खुल्या मध्ये मेडिकलच कचरा टाकण्यात येत आहे मोकाट जनावरे या भागांमध्ये हा कचरा खाताना दिसत आहे यापासून रोगराई मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये होऊ शकते याला कारणीभूत कोण असणार या सर्व गोष्टी घेऊन आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये बिंदुसरा नदी बचाव आंदोलन सर्व नागरिकांना सोबत घेऊन नदीपात्रात करणार या गोष्टी आम आदमी पार्टीच्या स्वच्छता मोहिमे दौरान निदर्शनास आल्या यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी जिल्हा सचिव रामधन जी जमाले शहराध्यक्ष सय्यद सादेक तालुका उपाध्यक्ष आजम खान शहर सचिव मिलिंद पाळणे इत्यादी उपस्थित होते