शहादेव वंजारे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह योगेश पर्वात जाहीर प्रवेश
बीड प्रतिनिधी: शहरातील प्रकाश आंबेडकर नगर भागातील शहादेव वंजारे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी मंत्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर, मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली योगेश पर्वात जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी शहादेव वंजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. व त्यांनी ज्या ज्या विकास कामांच्या मुद्द्यावर प्रवेश केला ती कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.यावेळी डॉ.योगेश भैया क्षीरसागर बोलताना म्हणाले की, आपल्या माध्यमातून बीड शहरात होत असलेल्या विकासकामांचा वाढता आलेख जनतेसमोर स्पष्ट आहे.काम मंजूर करून आणून ते पूर्ण करण्यापर्यंत आपला हेतू हा विकासाभिमुख राहिला आहे. लोकांना पण याची हळूहळू जाणीव होत आहे.त्यामुळे शहरातील अनेक व्यक्ती आपणाला पाठिंबा देत आहेत.त्यांनी दाखवलेला हा विश्वासच आगामी काळाची चाहुल देत आहे असे सांगितले.
प्रकाश आंबेडकर नगर भागात माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर आणि मा.नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून अनेक विकासाची कामे झाली आहेत. तरी देखील विकासाचा राहिलेला अनुशेष लवकरच भरून काढण्यात येईल. अलीकडच्या काळात या भागाची हद्द मोठ्या प्रमाणात वाढल्याने समस्या देखील वाढल्या आहेत. मात्र या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ज्या भागाची हद्द वाढ झाली आहे अशा भागात काम करत असताना रस्ते,नाली पाणी आणि वीज यांसह इतर समस्या सोडवाव्या लागतात. या भागात मोठ्या प्रमाणात गोर गरीब जनता राहत असल्याने त्या सर्वांना राहण्यासाठी हक्काचे चांगले घर मिळावे यासाठी रमाई आवास घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या अंतर्गत घरकुल मिळवून देण्यासाठी सहकार्य करु. प्रकाश आंबेडकर भागातील लोकांचे पीटीआर ला नाव लावणे, रस्ते, नाल्या, पाईपलाईन,विजेचे पोल इत्यादी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. विजेच्या पोल संदर्भात माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या माध्यमातून महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करून स्थानिक नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यात येईल असे सांगितले. तसेच या भागात नगरोत्थान अंतर्गत पहिल्या टप्यात बार्शी नाका ते इमामपुर रोड हा दर्जेदार रस्ता मा. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून झालेला आहे.असेच दर्जेदार रस्त्यांचे कामे शहरातील इतर भागात देखील झाले आहेत. आणि त्याच धर्तीवर आपल्या भागातील उर्वरित रस्ते देखील नगरोत्थान च्या पुढील टप्प्यात करण्यात येतील.स्थानिक भागातील समस्या,अडचणी दूर करण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिक आणि महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व येणाऱ्या काळात त्या सोडविण्याचे आश्वासन डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी दिले.
शहादेव वंजारे म्हणाले की, डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांच्याकडे विकासाची कास आहे हेच ओळखून मी आणि माझे मित्र परिवार योगेश पर्वात जाहीर प्रवेश करत आहोत.बीड शहरात
माजीमंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नांतून होत असलेल्या विकास कामामुळे मी प्रभावित झालो.मी ज्या विकास कामांचे मुद्दे मांडत प्रवेश करत आहे ते येणाऱ्या काळातडॉ.योगेश भैया क्षीरसागर नक्कीच मार्गी लावतील असा मला विश्वास असल्याचे सांगत येणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर नगर भागातून अधिकाधिक मताधिक्य देण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक सुधीर भांडवले, नाना मस्के, दिपक चौघुले, राजेंद्र कुसळकर, गोरख काळे, शुभम कातांगळे, कल्याण ढोले, अमोल गलधर, माजेद कुरेशी, अनिल वंजारे, विलास चक्रे, शेख शकील, विजय जगधने यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.