बीड येथील रोटरी क्लब च्या वतीने पत्रकार आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद
बीड प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील पत्रकारांची आरोग्य तपासणी बीड येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. सामाजिक, राजकीय क्षेत्राच्या बित्तंबातमी ठेवणारे आणि त्याबरोबरच जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर सातत्याने लिखाण करणारे पत्रकार स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र तेव्हढे जागरुक नसतात. परंतु सध्याच्या धकाधकीच्या काळात आरोग्याबाबतही तेव्हढेच सतर्क राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ.संतोष शिंदे यांनी केले.
यावेळी डॉ.संतोष शिंदे बोलत होते. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.रोटरी क्लबच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला, प्रास्ताविकात रोटरीचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी यांनी शिबीर आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच रोटरीच्या सामाजिक कार्यास पत्रकारांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी डॉ.गणेश ढवळे, संपादक दिलीप खिस्ती यांनी मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित पत्रकारांची बीपी, शुगर तपासणी करण्यात आली.आरोग्य तपासणी शिबिरात रोटरी क्लब व लाईफ लाईन हॉस्पिटल चे कर्मचाऱ्यांना हें शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
मराठी पत्रकार परिषदेचा ८३ वा वर्धापन दिन राज्यभरात मुख्यविश्वस्त पत्रकारांचे नेते एस एम देशमूख यांचे आवाहनानुसार पत्रकारांची आरोग्य तपासणी करून साजरा केला गेला.आयोजित शिबिराचे रोटरी क्लब चे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषद चे राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, सचिव सुनील जोशी,व विनीत बीड शहर पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे मा.विभागीय सचिव विशाल साळुंके,मा. अध्यक्ष सुभाष चौरे,मा.विलास डोळसे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय हांगे, डिजिटल मीडिया चे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, सोशल मीडिया चे जितेंद्र सिरसाठ, यांच्या यांच्या विनंतीवरून व रोटरी क्लबच्या आयोजित पत्रकार आरोग्य शिबीर येथील लाईफ लाईन रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यशस्वी करण्यासाठी बीड शहर पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे मा.विभागीय सचिव विशाल साळुंके, मा.अध्यक्ष सुभाष चौरे,मा.विलास डोळसे, प्रसिद्धी प्रमुख संजय हांगे, डिजिटल मीडिया चे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, सोशल मीडिया चे जितेंद्र सिरसाठ, यांनी परिश्रम घेतले.
यावेळी पत्रकार व संपादक दिलीप खिस्ति,बालाजी तोंडे,बालाजी मारगुडे ,डॉ.गणेश ढवळे,सुभाष चौरे,संजय हांगे,विशाल साळुंके,उदय नागरगोजे, अतुल कुलकर्णी, अनिल वाघमारे, जितेंद्र सिरसाट, प्रमोद ठोसर,सदाशिव नाईक, सुशील देशमुख, विनोद जिरे, हरिदास तावरे, दीपक सर्वोदने,मुकेश झनझने,केशव कदम,ज्ञानोबा वायभासे, श्वेता घाडगे, शेख युनूस,बालाजी जगतकर, प्रवीण घाडगे, धनंजय जोगडे, आदिल शेख, नानासाहेब माने,गुलदाद पठाण,संजय मिसाळ,डॉ. संजय तांदळे, चाटे भिभीषण, सुमन डापकर,प्रदीप राठोड, संजय शिंदे,रोहित देशपांडे, अनिल अष्टपुत्रे,दत्ता नरनाळे, संजय कुलकर्णी,दै. पुढारी: रोटरीचे अध्यक्ष कल्याणराव कुलकर्णी, सचिव सुनिल जोशी, वाय. जनार्धन राव, राजेंद्र मुनोत, अभय कोटेचा, सुरज लाहोटी, गणेश साळुंके, शांतीलाल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विवेक बडगे यांनी केले.
असंख्ये पत्रकार बांधवानी या शिबिरात भाग घेतला होता, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विवेक बडगे यांनी केले.
राज्यात इतर जिल्ह्यात,तालुक्यात विविध ठिकाणी आज पत्रकारांचे आरोग्य शिबीर घेण्यात आले.
मराठी पत्रकार परिषदेनं केला विश्वविक्रम
एकाच दिवशी ७००० पत्रकारांची आरोग्य तपासणी.
मराठी पत्रकार परिषदेचा ८४ वा वर्धापन दिन आज राज्यभर “पत्रकार आरोग्य तपासणी दिवस” म्हणून साजरा करण्यात आला.. परिषदेच्या या उपक्रमास राज्यभर जोरदार प्रतिसाद मिळाला.. ७००० पेक्षा जास्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांची आज राज्यात आरोग्य तपासणी करण्यात आली.. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा हा विश्व विक्रम असल्याचा दावा एस.एम देशमुख यांनी एका पत्रकाव्दारे केला आहे..
पत्रकार समाजासाठी अहोरात्र काम करीत असतात.. मात्र प्रकृतीकडे त्यांचे लक्ष असत नाही. त्यामुळे “एक दिवस आमच्यासाठी” या संकल्पनेअंतर्गत परिषदेचा वर्धापन दिन पत्रकार आरोग्य तपासणी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय परिषदेने चार वर्षांपुर्वी घेतला होता.. त्यास आता जोरदार प्रतिसाद मिळत असून परिषदेचा या उपक्रमाने आता चळवळीचे रूप घेतले आहे.. आज राज्यात १०,००० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प होता मात्र काही जिल्ह्यात ही शिबिरे नंतर घेतली जाणार असल्याने १०,००० चा आकडा गाठता आला नसला तरी ७०००पेक्षा जास्त पत्रकारांची आज तपासणी केली गेली.. ज्या जिल्ह्यांमध्ये आज पत्रकार आरोग्य तपासणी अभियानास जोरदार प्रतिसाद मिळाला त्यात पुणे, नगर, रायगड, रत्नागिरी, सांगली, बीड, धुळे, नांदेड, वाशिम, अकोला, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, नागपूर, गडचिरोली सिंधुदुर्ग, भंडारा, या आणि अन्य काही जिल्ह्यांचा समावेश आहे.. काही जिल्ह्यात स्थानिक अडचणींमुळे त्यांच्याकडे येत्या काही दिवसात ही शिबिरं होतील..
परिषदेच्या आवाहनानुसार राज्यातील जिल्हा संघ, तालुका पत्रकार संघांनी परिषदेचा हा उपक्रम यशस्वी करून दाखवल्याबद्दल एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, राज्य महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, राज्य डिजिटल मिडिया परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे त्याबद्दल त्यांचेही आभार.. बीड येथे रोटरी क्लबने शिबिरासाठी मदत केली त्याबद्दल आभार.. रोटरी बीडचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी यांनाही धन्यवाद..