रॅली व पथनाट्याद्वारे ग्रामीण विकास केंद्रातर्फे जनजागृती
अंमळनेर (प्रतिनिधी) युनिसेफ, एस.बी.सी.३,जिल्हा प्रशासन, महिला व बाल कल्याण विभाग यांच्या सहकार्याने व कालिका देवी महाविद्यालयाचे सहयोगाने ग्रामीण विकास केंद्र गोमळवाडा या संस्थेच्या वतीने अंमळनेर ता.पाटोदा गावामध्ये युवा सक्षम दिन,बाल विवाह विरोधी रॅली व पथनाट्यचे दिनांक १ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते जनजागृती रॅली भैरवनाथ व गणेश विद्यालय पासुन भवानी चौक ,अंमळनेर गाव ते व्यापार पेठ व गणपती मंदिर पर्यंत काढण्यात आली रॅलीमध्ये बालकांनी विविध संदेश देत घोषणा दिल्या सांगू ठणकावून पुन्हा पुन्हा बाल विवाह आहे कायद्याने गुन्हा, रोटी खेल पढाई प्यार, हर बच्चे का है अधिकार ! एक दोन तीन चार, बाल विवाह प्रथा करु हद्दपार! या घोषणांनी सारे शहर दुमदुमले ‘रॕलीचे ऊद्घाटण तहसीलदार रुपाली चौगुले यांनी केले रॅली नंतर बाल विवाह चे दुष्परिणाम या विषयावर कालिका देवी महाविद्यालयातील विशाल बलैया,उमेश कुलथे, ऋषीकेश कानडे,पायल कानडे,करिष्मा जावळे,आकांक्षा सोनवणे, वैभव जाधव पवन वणवे या विद्यार्थ्यांनी जनजागृती पर पथनाट्य सादर करून प्रेक्षकांना भावनिक करून टाकत ज्वलंत विषय मांडला पथनाट्य दरम्यान बाल विवाहामुळे गर्भवती मुलीचा मृत्यु चा हृदय पिळवणूक टाकणारा प्रसंग पाहताना अबाल वृद्ध व महिला वर्गाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.
यावेळी’.गणेश विद्या मंदिर , भैरवनाथ विद्यालय , कला विज्ञान महाविद्यालय,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंमळणेर येथील शेकडो बालकांनी व किशोरवयीनांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला रॅली व जनजागृती पथनाट्यसाठी ग्रामीण विकास केंद्रचे अध्यक्ष समिर पठाण, युनिसेफ,एस.बी. सी.3 च्या प्रकल्प समन्वयक सोनिया हांगे, मंडळ अधिकारी निळकंठ सानप,गणेश विद्यालयाचे प्राचार्य स्वामी गुळवे कला विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनसोडे,भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक वैष्णव शिंदे जि. प.शाळा केंद्रिय मुख्याध्यापक गहिनीनाथ डोळे, प्रा डॉ.चेतना डोंगळीकर, प्रा.डॉ. कोरडे, प्रा.डॉ. येडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी,
सतिष मुरकुटे, तलाठी गीताराम वारंगुळे, ग्रामसेवक प्रवीण सानप , ग्रामपंचायत कर्मचारी भैरवनाथ विद्यालय, गणेश विद्या मंदिर, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,जिल्हा परिषद शाळा चे सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी रॅली व पथनाट्य यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी परिसरातील शेकडो महिला व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.
दिनांक ३० नोव्हेंबर व ०१ डिसेंबर असा दोन दिवस कार्यक्रम पार पडला पहिल्या दिवशी , मुला मुलींचे दाळ तांदूळ गहू वेगवेगळे करणे,लगोरी,कबड्डी, जड वस्तू उचलणे,व्यावहारिक ज्ञान,उंच उडी यशा प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा झाल्या तर दुसऱ्या दिवशी दिनांक १ डिसेंबर जनजागृती रॅली ,पथनाट्य सादर करून व पोस्टर चिकटून जनजागृती करण्यात आली व स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना तहसीलदार रुपाली चौगुले, सोनिया हांगे,समिर पठाण यांच्या हस्ते सन्मानित करून बक्षीस वितरण करण्यात आले , नागरिकांशी व लग्नाच्या संबंधित असणाऱ्या विविध व्यावसायिक घटकांशी चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात आल्या.