पाटोदा : तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्तिवरील शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना तराफ्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असून वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर अडवलेला रस्ता २-३ दिवसात मोकळा करण्याचे आश्वासन देऊन दीडमहिना उलटुनही कोणतीही उपाययोजना करणा-या तहसिलदार रूपाली चौगुले यांच्या असंवेदनशील व बेजबाबदार धोरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांनी १८ डिसेंबर रोजी होणा-या ग्रामपंचायत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून तसे लेखी निवेदन जिल्हा निवडणूक आधिकारी तथा जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना दिले आहे. निवेदनावर
परमेश्वर शिंदे,बाबासाहेब शिंदे,नामदेव शिंदे,जितेंद्र भोरे,आकाश भोरे,बिभिषण भागडे,दत्तु भागडे,समाधान शिंदे,दासु शिंदे आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.
तहसिलदार रूपाली चौगुले यांच्याकडुन शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांची फसवणूक :-डाॅ.गणेश ढवळे
दि.१३ ऑक्टोबर रोजी शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांसह रामेश्वर साठवण तलावात जलसमाधी आंदोलन दरम्यान तहसिलदार रूपाली चौगुले यांनी गटविकास आधिकारी पंचायत समिती सुमित जाधव व पोलीस निरीक्षक आर.पवार यांच्या समक्ष २-३ दिवसात स्वतः शेतक-यांने अडवणुक केलेल्या रस्त्याची पाहणी करून रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळेच जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले होते परंतु या घटनेला दीडमहिना उलटुन देखील रस्ता मोकळा करून न दिल्यामुळे शिंदेवस्तिवरील आंदोलनकर्ते ग्रामस्थांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
३० लाख रूपये बजेट केवळ तहसिलदार यांच्या हलगर्जीपणामुळे पडुन
आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांनी रस्ता व २ तराफ्यांसाठी ३० लाख रूपये निधी मंजूर केला असून केवळ तहसिल कार्यालयाकडुन अडवणुक केलेला रस्ता मोकळा न केल्यामुळे पडुन असुन त्यामुळे शिंदेवस्तिवरील ग्रामस्थामध्ये तिव्र नाराजी आहे. नाईलाजास्तव ग्रामस्थांना मतदानावर बहिष्काराचे हत्यार उपसावे लागत आहे.