नगर पालिकेने तात्काळ प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात – सातीराम ढोले
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शहरातील वार्ड क्रमाक 25 मध्ये गेल्या काही वर्षापासून नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. नळ जोडणी झाली असून सुद्धा येथील नागरीकांना अजून सुद्धा नळाद्वारे पाणी देण्यात आलेले नाही. यासह येथील काही भागात पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी विविध समस्यांचा सामना नागरीकांना करावा लागत आहे. बार्शी नाका येथील चौकाचे सुशोभीकरण करण्याची गरज आहे. यासह बार्शी नाका परिसरातील पोलीस चौकीस कायम पोलीस कर्मचारी तैनात करण्यात यावेत. या परिसरात वेळेवर नाल्यांची साफसफाई करण्यात येत नसल्यामुळे नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवार यासंदर्भात आवाज उठवून सुद्धा नगर पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. तरी नगर पालिकेने वार्ड क्रमांक 25 मधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून येथील नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसंग्रामचे नेते सातीराम ढोले यांनी केली आहे.
नागरीकांना मुलभूत सुविधा मिळव्यात यासाठी नगर पालिकेचे स्थापना करण्यात आलेली आहेत. परंतू बीड शहरातील अनेक भागात नागरीकांना अजून सुद्धा मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. बीड शहरातील वार्ड क्रमांक 25 मधील बार्शी नाका, बाजीराव नगर, शिवनेरी कॉलनी, प्रकाश आंबेडकर नगर यासह इतर भागात गेल्या काही वर्षापासून येथील नागरीकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात अनेक वेळा नगर पालिकेकडे पाठपुरावा करण्यात आलेले असून सुद्धा याकडे मात्र लक्ष देण्यात येत नाही. कानिफनाथ नगर (ढोले वस्ती) हनुमान नगर (गलधर वस्ती) याठिकाणी नळाची जोडणी करण्यात आलेली आहे. परंतू अजून तरी येथील नळांना पाणी सोडण्यात येत नाही. यामुळे येथील नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आलेली आहे. येथील काही ठिकाणी पथदिवेच नसल्यामुळे नागरीकांना रात्रीच्या वेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बार्शी नाका परिसरातील पोलीस चौकी बंद असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तरी येथील पोलीस चौकीला कायम पोलीस कर्मचारी देण्यात याव्यात. येथील परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येत असल्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.वार्ड क्रमांक 25 मधील सर्व प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत अशी मागणी शिवसंग्रामचे नेते सातीराम ढोले यांनी केली आहे.
बार्शी नाका, प्रकाश आंबडेकर नगर व इतर ठिकाणी शौचालय उभाण्याची गरज
वार्ड क्रमांक 25 मधील अनेक ठिकाणी शौचालय नसल्यामुळे येथील नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात बार्शी नाका व प्रकाश आंबेडकर नगर येथे शोचालय असणे महत्वाचे आहे. या संदर्भात अनेक वेळा आवाज उठवण्यात आलेला आहे. परंतू या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे नगर पालिकेने तात्काळ याठिकाणी शौचालय उभारण्याची गरज आहे.