पहिल्यांदाच पेवर लेवलींग मशिनचा वापर
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : प्रदीर्घ काळानंतर मोंढा परिसरातील व्यापाऱ्यांच्या रस्त्यांची दैना फिटणार असून सध्या मोंढा परिसरात सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून ते काम दर्जेदार होण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी कामाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. बीड शहरात प्रथमच पेवर लेवलींग मशिनचा वापर होत असून हे काम दर्जेदार करण्याच्या सूचना सुद्धा यंत्रणेला आ.संदीप क्षीरसागर यांनी दिल्या.
बीड शहरातील मोंढ्यात सुरू आसलेल्या सिमेंट रस्ता कामासाठी पहिल्यांदाच पेवर लेवलींग मशिनचा वापर होत आहे. या मशीनचा वापर व्हावा यासाठी येथील व्यापाऱ्यांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे मागणी केली होती. त्याअनुषंगाने या मशिनचा वापर येथील सिमेंट रस्ते कामात होत आहे. मेोंढ्यामध्ये मोठी वर्दळ असल्यामुळे हा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी आ.संदीप क्षीरसागर पूर्वीपासूनच प्रयत्नशील आहेत. आज त्यांनी मोंढा परिसरात जावून कामाची पाहणी केली. यावेळी संबंधित यंत्रणेतील अधिकारी, कंत्राटदार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.