बीड प्रतिनिधी) -कोल्हारवाडी फाटा येथील श्रीक्षेत्र अवधूत दत्त देवस्थान येथे गेल्या 13 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद गुरुचरित्र पारायण आणि जन्मोत्सव सोहळा आयोजित केला जातो. गेल्या वर्षी याच ठिकाणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ह.भ.प.ढोक महाराज यांच्या कीर्तन प्रसंगी पुढच्या वेळी येऊ तेव्हा रस्त्याचे काम पूर्ण झालेले असेल असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्ती करत काल ह.भ.प. बाळकृष्ण दादा वसंतगडकर महाराज यांच्या कीर्तन प्रसंगी उपस्थित राहून रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कोल्हारवाडी फाटा येथील श्रीक्षेत्र अवधूत दत्त देवस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् गुरुचरित्र पारायण व जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमास दोन दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. काल ह.भ.प. बाळकृष्णदादा वसंत गडकर महाराज यांच्या कीर्तन प्रसंगी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देवस्थानास भेट दिली. यावेळी देवस्थानचे दत्त उपासक ह.भ.प.श्रीहरी महाराज पवार यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की सलग तेरा वर्षापासून कोल्हारवाडी फाटा येथील दत्त देवस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते या ठिकाणी असलेल्या दत्तगुरूंच्या चरणी हजारो भक्त नत मस्तक होतात, गेल्या वर्षी सप्ताह निमित्त शब्द दिला होता सिमेंट रस्त्यावरूनच येऊ आज या रस्त्याचे काम पूर्ण होत आहे याचे समाधान वाटते शहरापासून जवळच असलेले हे देवस्थान असल्यामुळे बीड शहरात तील अनेक भाविक या ठिकाणी येतात त्यामुळे रस्त्याचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे होते धारणा साधना आराधना प्रार्थना या ठिकाणी अखंडपणे होते त्याची अनुभूती आली तरच विश्वास बसतो, अनेक भाविक या ठिकाणी येऊन दत्तगुरूंचा आशीर्वाद घेतात, वारकरी संप्रदायाचा प्रचार, प्रसार अटकेपार नेऊन संत नामदेवांनी हा पाया रचला आणि संत तुकारामांनी कळस चढवला,म्हणूनच नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असे म्हणतात,असा वारकरी संप्रदाय आजही अनेकांना भक्ती मार्ग शिकवतो आहे,आपली संस्कृती काय आहे याची शिकवण अखंड हरिनाम सप्ताहात मिळते,परमेश्वराचे नामचिंतन करून मनाला समाधान मिळवायचे असेल आणि मनःशांती करायची असेल तर हरिनाम सप्ताहात प्रत्येकाने तन धन मनाने एकरूप होऊन सहभागी व्हायला हवे
यावेळी ह.भ.प. नाना महाराज कदम, सुरेश महाराज जाधव, विलास बडगे, दिनकर कदम, अरुण डाके, सखाराम मस्के, नानासाहेब काकडे, अँड.राजेंद्र राऊत, जिवन कुलकर्णी, आळंदी येथील भजनी मंडळ व परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.