बीड : तालुक्यातील मौजे. बेलगाव येथील बेलेश्वर मंदिरातुन दि.२० सप्टेंबर रोजी चोरीला गेलेला पंचधातुचा मुकुट सापडला असून आज दिनांक.१ डिसेंबर गुरूवार रोजी नेकनुर पोलीस स्टेशन प्रभारी एपीआय विलास हजारे,उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या हस्ते बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.महादेव भारती महाराज,ह.भ.प.तुकाराम भारती महाराज यांना सुपुर्त करण्यात आला यावेळी नेकनुर पोलीस प्रशासनातील आधिकारी,कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर उपस्थित होते.
मौजे. बेलगाव ता.जि.बीड येथील सुप्रसिद्ध बेलेश्वर मंदिरातील पंचधातुचा मुकुट व शेषनागाची मुर्ती आदि गाभाऱ्यातील साहित्य दि.२० सप्टेंबर रोजी पहाटे मंदिराचे कुलुप तोडून चोरट्यांनी पळवल्याची तक्रार फिर्यादी नामे महादेव भारती गुरू संतराम भारती यांनी नेकनुर पोलीस स्टेशन येथे गुरन.२१७/२०२२ कलम ३८० ,४५७ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
अपर अधिक्षक कविता नेरकर ,उपअधिक्षक संतोष वाळके घटना स्थळी भेट
____
बेलेश्वर मंदिरातील पंचधातुंच्या मुर्ती चोरी प्रकरणात पोलीस प्रशासनातील वरिष्ठ आधिकारी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपअधिक्षक संतोष वाळके यांनी ताबडतोब घटनास्थळी पाहणी करून घटनेच्या रात्रीतील डम डाटा गोळ् करण्याचे आदेश तपास आधिकारी नेकनुर पोलीस स्टेशन सपोनि शेख मुस्तफा,उपनिरीक्षक विलास जाधव यांना दिले होते .
खोडसाळपणातुन घटना घडली असावी बेलेश्वर बाबांचे महात्म्य अगाध आहे:- ह.भ.प.महादेव भारती महाराज
___
बेलेश्वर मंदिरातुन मुर्तीची चोरी जाण्याची घटना प्रथमच घडली असून बेलेश्वरचे महात्म्य अगाध असुन पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धा असून कोणीतरी खोडसाळपणातुन हा प्रकार केला असावा अशी शंका अगोदरच बोलुन दाखवली होती.मंदिराच्या पाठीमागील डोहामध्ये पाणी ओसरल्यानंतर एका शेतक-याच्या दृष्टीस पडल्यानंतर पोलीस पंचनामा करून जप्त करण्यात आलेली मुर्ती आज आमच्या स्वाधीन करण्यात आली.