राजकीय षडयंत्र रचून अवलंबिलेली पद्धत भविष्यात इतरांवर पण अवलंबिली जावू शकते; सर्व चौकशांना सामोरे जाण्यास तयार
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : माजी मंत्री सुरेश धस यांच्या विरोधात मंगळवारी रात्री आष्टी पोलीस ठाण्यात हिंदु देवस्थान इनामी जमीन प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर राजकीय वर्तूळामध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात असताना गुन्हा नोंद झाल्यानंतर आज आ.सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून माझ्यावर राजकीय षडयंत्र रचून अवलंबिलेली पद्धत भविष्यात राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या इतरांवर सुद्धा अवलंबिली जावू शकते, तसेच सर्व चौकशांना सामोरे जाण्यास मी तयार असून माझ्यावर व माझ्या परिवारावर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे आ.सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
रामदास खाडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आ.सुरेश धस, पत्नी प्राजक्ता धस, बंधू देविदास धस, मनोज रत्नपारखी, अस्लम नवाब खान यांच्यासह इतरांवर अपसंपदा जमा केल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला होता. यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे या प्रकरणात पुढील तपास करून यामध्ये अजून काही गैरकामे किंवा केलेले आरोप बरोबर की चूक हे पुढील प्रक्रियेतच समजणार आहे. त्याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढील तपास करत आहेत. मंगळवारी गुन्हा नोंद झाल्यानंतर आ.सुरेश धस यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून मी सर्व चौकशीसाठी तयार आहे. तसेच राजकीय षडयंत्र रचून माझ्यावर अवलंबिलेली पद्धत ही भविष्यात इतरांवर सुद्धा अवलंबिली जावू शकते अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
न्यायालय आम्हाला न्याय देईल
आष्टी तालुक्यातील देवस्थान जमिनप्रकरणी रामदास खाडे यांच्या तक्रारीवरून आ.सुरेश धस यांच्यासह, पत्नी, बंधू व इतरांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आज आष्टी येथील निवासस्थानी आ.सुरेश धस यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, एखाद्या लोकप्रतिनिधी विरोधात तक्रार आली तर त्या तक्रारी संदर्भात राज्य सरकारची परवानगी घेवूनच त्या लोकप्रतिनिधीवर गुन्हा नोंद केला जातो परंतु तसे झाले नाही. जर असे होत असेल तर भविष्यात एखाद्या लोकप्रतिनिधीविरोधात षडयंत्र रचून ही पद्धत अवलंबिली जावू शकते. आमच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असून न्यायालय आम्हाला न्याय देईल असे मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त केले.