एच आय व्ही चे 2030 पर्यंत उच्चाटन करु…
Beed : एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन जनजागृती म्हणून साजरा केला जातो. एड्स हा महाभयंकर रोग असून त्याला हद्दपार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. त्या निमित्ताने आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृती रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. जनजागृती रॅलीचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, सीईओ अजित पवार शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे, विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश गोडबोले यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवत रॅलीचे उद्घाटन केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त आज जिल्हा रुग्णालय अंतर्गत HIV विभागाच्या वतीने शहरातून जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. शहरातील शाळा आणि सामाजिक संस्था या जनजागृती रॅलीत सहभागी झाले होते रॅली ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून बलभीम चौक, माळीवेस चौक, अण्णाभाऊ साठे चौक बस स्टॅन्ड डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे समारोप करण्यात आला. यावेळी आपली एकता, आपली समानता, एचआयव्ही सह जगणाऱ्या करिता. असे अध्यक्ष समारोपावेळी त्यांनी म्हटले.बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी विद्यार्थ्यांसह संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एड्स या आजारा विषयी सखोल माहिती दिली. यावेळी एड्स जनजागृती रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या संस्था, महाविद्यालय,शाळा यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी इन्फंट इंडिया संस्था प्रमुख दत्ताभाऊ बारगजे, अशोक तांगडे तहसील कांबळे. विद्यार्थ्यासह शिक्षकाची उपस्थित होती . “एड्स ” या विषयावर जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले.