मुरलीधर ढेंगळे यांचा सेवापुर्ती समारंभ थाटात संपन्न
गेवराई प्रतिनिधी : गेवराई तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोरगरिब जनता आणि शेतकऱ्यांच्या मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांनी जयभवानी शिक्षण संस्थेचे रोपटे लावून हे शिक्षण संकूल उभा केले, त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जडणघडण झाली असून संस्थेच्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे त्यात महत्वपूर्ण योगदान आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठिशी शिवछत्र परिवार कायम उभा आहे असे प्रतिपादन युवानेते पृथ्वीराज पंडित यांनी केले. गढी येथील जयभवानी विद्यालयातील सहशिक्षक मुरलीधर ढेंगळे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले, त्यानिमित्त आयोजित केलेल्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात ते बोलत होते.
गढी येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक मुरलीधर ढेंगळे ३० नोव्हेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ जयभवानी विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला युवानेते पृथ्वीराज पंडित यांच्यासह प्राचार्य वसंत राठोड, डॉ.सदाशिव सरकटे, डॉ. अर्जुन मासाळ, उपमुख्याध्यापक सानप आर.एस. आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पृथ्वीराज पंडित यांच्या हस्ते मुरलीधर ढेंगळे व सौ. शारदा ढेंगळे यांचा शाल ,श्रीफळ,फेटा आणि मानाचा आहेर देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना पृथ्वीराज पंडित म्हणाले की, आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली शिवछत्र परिवार आज तुमच्यासाठी काम करतो आहे. या शिक्षण संस्थेतून शेकडो विद्यार्थी शिकून गेले. विद्यार्थी, पालकांचा सहभाग आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक कामामुळे संस्थेची प्रगती झाली. कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराने जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थे मध्ये जिव्हाळा लावून काम केले. गेवराई तालुक्यातील गोरगरिबांची मुले शिकली मोठी झाली. संस्थेने तालुक्याचा विश्वास संपादन केला. नुसते शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संस्था काम करत असल्याचा विश्वास व्यक्त करुन शिवछत्र परिवार कायम तुमच्या पाठीशी आहे असेही ते यावेळी म्हणाले.
प्राचार्य वसंत राठोड म्हणाले की, गेवराई तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार माजीमंत्री शिवाजीराव दादा पंडित यांनी जयभवानी शिक्षण संस्थेची स्थापणा केली, त्यांच्या माध्यमातून मुरलीधर ढेंगळे सरांसारख्या सर्वसामान्य जनतेच्या मुलांना नौकरी करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे गेवराई तालुक्यात शिक्षणाची मोठी चळवळ उभी राहिली असेही ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना मुरलीधर ढेंगळे यांनी माजी मंत्री शिवाजीराव पंडित दादांच्या संस्थेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे मी भाग्य समजतो, त्यामुळे माझे जीवन सार्थ झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभाऊ हकाळे यांनी केले. सुत्रसंचलन रणजित बडे यांनी केले तर पर्यवेक्षक गायकवाड के.एन. यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला
चंद्रकांत पंडित, सौ.शारदा मुरलीधर ढेंगळे, मोनिका ढेंगळे, मानसी ढेंगळे, मयुरेश ढेंगळे, मंगेश ढेंगळे, भागवत ढेंगळे, अंबादास गव्हाणे, शिवाजी ढेंगळे, हनुमान जाहेर, पांडुरंग सिराम, शहादेव ढेंगळे यांच्यासह सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ, मुरलीधर ढेंगळे यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.