बीड: दरवर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होत असून शेतकरी बांधवाचा हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी हिरापूर येथे साईप्रसाद नॅचरल शुगरची उभारणी करण्यात आली असून बुधवार दि.३० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील संत-महंतांच्या उपस्थितीत प्रथम बॉयलर अग्नि प्रदिपन संमारंभ संपन्न झाला. थोड्याच दिवसात हा कारखाना सुरू होत असल्याने अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मिटणार आहे.
बीड येथील उद्योजक चेअरमन लक्ष्मण परभणे, संचालक बळीराम गवते, शाहीनाथ परभणे, महेश दाभाडे, प्रज्ञेश पराड यांन मिळून हिरापूर (ताग़ेवराई) येथे साईप्रसाद नॅचरल शुगरची उभारणी केली आहे.बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभास धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत शिवाजी महाराज, मच्छिंद्रनाथ संस्थानचे ह.भ.प.जनार्धन महाराज शिंदे, रामगड संस्थानचे ह.भ.प.स्वामी योगीराज महाराज, चिंतेश्वर संस्थानचे ह.भ.प.मसाननाथ महाराज, गौतमऋशी संस्थानचे ह.भ.प.श्रीरंग डोंगरे महाराज, दत्त संस्थानचे ह.भ.प.हनुमान महाराज गिरी, मादळमोही संस्थानचे ह.भ.प.संभाजी महाराज, तळेवाडीचे ह.भ.प.विष्णू महाराज, दत्त संस्थानचे ह.भ.प.वसंत महाराज यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रम राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष बबन गवते, प्रभाकर पराड यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मदन जाधव, जिल्हा परिषद सदस्य ॲड.प्रकाश कवठेकर, राजेंद्र लाटे, पत्रकार दत्ता देशमूख, संदिप लवांडे, संजय मालाणी, संजय तिपाले, केशव कदम, मुकेश झनझणे, गेवराई, बीड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
आपल्या भागातील शेतकऱ्यांचा ऊस अतिरिक्त राहू नये, त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी साईप्रसाद नॅचरल कारखाना सुरू केला आहे.अनेक अडचणीवर मात करून हा कारखाना उभा राहिलेला असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी हा कारखाना वरदान असेल, हा विश्वास आहे.- बबन गवते, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी.
बीड आणि गेवराई तालुक्याच्या हद्दीवर साईप्रसाद उभा राहिल्याचे पाहून आनंद होत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण काम करावे, नगदनारायण कायम आपल्या पाठिशी असेल. सत्कर्म कधीही वाया जाणार नाही, शेतकऱ्यांच्या जिवनात हा कारखाना महत्वाचा ठरावा.
-ह.भ.प.महंत शिवाजी महाराज, मठाधिपती, श्री.क्षेत्र नारायणगड.