रिपाइंकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरु
बीड / प्रतिनिधी
महाराष्ट्रासह देशभरात गायरान धारकांच्या न्यायिक हक्काच्या आणि अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात रिपाइं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार (दि.३०) रोजी बीडसह जिल्ह्यातील सर्व तहसिलसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपाइं आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देत, एक इंचही गायरान जमिन सरकारला हडपू देणार नाहीत.अशा मागणीचे निवेदन प्रशासनास दिले.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, दलित,भुमिहिन,आदिवासी, पारधी,गावकुसां बाहेरील उपेक्षित भूमिहीन लोकांच्या ताब्यात असणाऱ्या गायरान जमिनी शासनाने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्या संदर्भात नोटीसा दिल्या जात आहेत. परंतु आम्ही सरकारला एक इंचही गायरान जमीन परत घेऊ देणार नाहीत. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसिलसमोर आंदोलन करण्यात आले. दलित भूमिहीन शेतमजुरांच्या 1990 पासुन ताब्यात असणारी गायरान ह्या त्यांच्या हक्काच्या जमिनी आहेत.त्याचबरोबर 2010 पर्यंतच्या गायरान जमिनी नावे करण्यासाठी देखील रिपाइं पाठपुरावा करत आहे. राज्यातील गायरान जमिनी संदर्भात रिपाइंकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित “महाधरणे आंदोलनात” राजू, जोगदंड,सचिन कागदे,किसन तांगडे, मायाताई मिसळे, बापू पवार, गोवर्धन वाघमारे, किशोर कांडेकर, अशोक साळवे, अविनाश जावळे, महादेव उजगरे, दिपक कांबळे,दशरथ सोनवणे, अरुण भालेराव, डॉ.नरेंद्र जावळे, धोंडीराम सिरसाठ, महेश आठवले, लक्ष्मण सिरसाठ,अरुण निकाळजे, सुभाष तांगडे, दीपक अरुण, महेंद्र वडमारे, भैय्यासाहेब मस्के, गणेश वाघमारे, भाऊसाहेब दळवी, सतीश शिनगारे, रेश्माताई जोगदंड, धम्म पारवे, शाम वीर, सोनू वडमारे, खुशाबा गव्हाणे, राजू वक्ते, भैय्यासाहेब वाघमारे, भीमा घोडेराव यांच्यासह यांच्यासह गायरान धारक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.