बीड । प्रतिनिधी : श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटच्या शेवगांव शाखेचे थकित कर्जदार रितेश रमेश हुशार, वय 34 वर्ष रा. शेवगाव, ता. शेवगाव जि.अहमदनगर यांनी सन 2016 मध्ये 50 हजार रूपये व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. त्यांना वारंवार समक्ष भेटुन, विनंती करूनही थकित कर्जाचे हप्ते भरण्यास सांगूनही त्यांनी कोणताही प्रतीसाद देला नाही . या उलट श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटच्या कर्मचारी यांना उध्दट बोलुन धमकावत असे , श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटच्या वतीने थकित कर्जदार रितेश रमेश हुशार यांच्या विरुद्ध 138 अंतर्गत न्यायालयात तक्रार दाखल करत कारवाई केली आसतांना आज दिनांक 29/11/2022 रोजी शेवगाव पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी श्री.एस.एस.हाडके साहेब यांनी बीड येथील न्यायालयात हजर केले. सह.दिवाणी न्यायाधिश, बीड यांनी 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, या कारवाई ने मात्र श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटच्या थकित कर्जदारांचे धाबे दनानले आहेत.
या कारवायीत कर्ज अधिकारी मा.शरद कुलकर्णी साहेब, शेवगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री.काकासाहेब हिंगे सर , वसुली अधिकारी श्री.सुशांत सत्राळकर, श्री.अंकुश हजारे, बीड येथील मुख्य शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री.संजयजी लाटे साहेब व अशोक वरपे, श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटच्या वतीने अँड.श्री.भगवानराव ढाकणे साहेब यांनी काम पाहिले.