–बातमी तीच पण वाचकांना आवडणाऱ्या शैलीत
–सामान्यांच्या हिताची पत्रकारीता करणारा संपादक म्हणजे गंमत भंडारी
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : दैनिक म्हणजे समाजाचा आरसा असतो, परंतू हाच आरसा काही प्रमाणात आज नेत्यांची चाटुगिरी करताना दिसत आहे. नेत्यांच्या तालावर नाचणारे अनेक दैनिक आहेत. खोट्या नेत्यांची लाल करण्यासाठी रोज अनेक जण लिखान करतात, परंतू सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे आज खुप कमी दैनिक आहेत. त्यात पार्श्वभुमी सारख्या दैनिकाचे नाव घ्यावेच लागेल. 26 नोव्हेंबर 1990 मध्ये सर्व सामान्य कुटूंबातील एका युवकाने दैनिक पार्श्वभुमीचे एक छोटे रोपटे लावले होते. सुरुवातीचा काळ एवढा खडतर होते की, काही दिवसातच हे दैनिक बंद करण्याची वेळ आली होती. परंतू गंमत भंडारी हा युवक असल्या अडचणींना थारा देणारा नव्हता, परत जिद्दीने दैनिकातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन जोमाने सुरुवात केली व नंतर कधीच मागे वाळून पाहिलेच नाही. आज याच पार्श्वभुमी दैनिकाला 32 वर्ष पुर्ण होत आहेत यानिमित्ताने पार्श्वभुमीचे संपादक गंमत भंडारी व त्यांच्या टिमला प्रारंभ परिवाराकडून भरभरुन शुभेच्छा…!
प्रत्येकाच्या आयुष्यात छोटा मोठा संघर्ष असतोत, कोणाच्या आयुष्यात छोटा तर कोणाच्या आयुष्यात मोठा संघर्ष पण संघर्ष असतोच. बीड जिल्हा विकासापासून कोसो दुर असलेला जिल्हा ह्या जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या प्रंचड आहे. यामुळे येथील युवक लागेल ते काम करतात, यात पार्श्वभुमीचे संपादक गंमत भंडारी सुद्धा येतात. सुरुवातीच्या काळात जमेल ते काम करुन त्यांनी आज एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बातमी तीच पण वाचकांना आवडणारी मग ती बातमी चांगल्या चांगल्या न पटणारी असली तरी ती बातमी होणार म्हणजे होणारच. बीड जिल्ह्यातील वाचणीय दैनिक, बॅनर बातमीची वेगळी छाप असणारे दैनिक म्हणून आज पार्श्वभुमी सर्वांना परिचित आहे. पत्रकारिता करणे जेवढे सोपे दिसते तेवढे सोपे नाही. जिवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारिता करावी लागते. हे बोलण्या एवढे सोपे नक्कीच राहीलेले नाही. एका बातमी मुळे अनेकांचे कोटीचे नुकसान झाल्यानंतर नुकसान झालेले मात्र ती बातमी बनवणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवून असतात. अशा एक नाही रोजच बातम्या करणाऱ्या गंमत भाऊंचा प्रवास सोपा नक्कीच नाही. पार्श्वभुमीच्या पुढील वाटचालीस प्रारंभ परिवाराकडून परत भरभरुन शुभेच्छा…!