नांदेड : भष्टाचारावर आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या आणि भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ अशी ओळख असणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कुंपनच शेत खातंय या म्हणीचा प्रत्यय आला आहे. नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाच आता भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन मध्यस्थांमार्फत एक लाखाची लाच मागणाऱ्या महिला पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. मीना बकाल असे या निरीक्षकाचे नाव असून त्यांच्या पतीलाही अटक करून या दोघांचीही रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.