अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश
गेवराई प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा पक्ष असून शेतकऱ्यांच्या हितासाठी ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार घराघरा पर्यंत पोंहचवून राष्ट्रवादीची ताकद वाढवा आणि एक दिलाने काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई तालुक्यातील साठेवाडी, राजपिंप्री व रानमळा येथील भाजपा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी ते बोलत होते.
गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित साहेब आणि जि. प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत ईनकमिंग सुरु आहे. साठेवाडी येथील लक्ष्मीकांत क्षीरसागर, सतिष हुंबे, पंढरीनाथ धोत्रे, समाधान अनभुले, विकास गुजर, श्रीहरी धोत्रे, बबन पवार, बाळू धोत्रे, गोविंद यादव, प्रसाद हुंबे, सतिष अनभुले, मच्छीन्द्र राजापुरे, बाळू राजापुरे, बंडू शिंदे, गोरख राजापुरे, अनिल गुजर, रविराज शेळके, सुनिल धोत्रे, भाऊसाहेब गुजर, सुनिल अनभुले आदिंसह शेकडो युवा कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये “शिवछत्र” येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी वैजीनाथ अनभुले, बाबासाहेब पवार, जिजा अनभुले, राजेंद्र गुजर, बाळू अनभुले, रावसाहेब धोत्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राजपिंरी येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते महादेव नाईक, सदाशिव नाईक, एकनाथ नाईक, भिमराव नाईक, नवनाथ नाईक, मदन नाईक, राम नाईक, सावता नाईक , महेश हराळे, ज्ञानेश्वर टाकले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपचा त्याग करून अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये “कृष्णाई” येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, दिलीप पानखडे, दत्तोपंत पानखडे, उद्धव पानखडे, गणेश पानखडे, राजू शेख, अजय आरडे, संभाजी पानखडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रानमळा येथील शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य सतिष जाधव, निलेश हिंगे यांच्यासह संतोष जाधव, नारायण जाधव, रेवन जाधव आदींनी शिवसेनेला सोडचिट्ठी देत माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये “कृष्णाई” येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, श्रीराम आरगडे, बळीराम चव्हाण, प्रल्हाद हिंगे, उद्धव जाधव, मोहन जाधव, विष्णू खवले, शिवाजी निकम, सुधीर हिंगे, अर्जुन आरगडे, नारायण आरगडे, गिताराम निकम, राजेंद्र हिंगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.