Beed : रात्रीचा दिवस करून वंचित उपेक्षित महिला अल्पसंख्यांक यांच्यासाठी बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस राब राब राबून जगातील सर्वश्रेष्ठ असे संविधान तयार केले. संविधानाचे जतन करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी औरंगाबाद येथे संविधान दिना निमित्त केले आहे.
जगातील सर्व घटनांचा तौलनीक अभ्यास करून सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम बाबासाहेबांनी केले कलम 4,5,6 घालून नागरिकत्वाचा अधिकार दिला कायद्यासमोर सर्व समान आहेत. कोणालाही भेदभाव करता येणार नाही गाव बंदी रोटी बंदी लोटी बंदी बेटी बंदी स्पर्श बंदी उठवली. संपूर्ण देशात संचाराचे स्वातंत्र्य दिले एका अर्थाने बाबासाहेबांनी आमच्यावर डोंगराएवढे उपकार केले हे संविधान म्हणजे भारताचा आत्मा आहे असे परखड विचार प्रा सुशिलाताई मोराळे यांनी व्यक्त केले. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा, प्राचार्य वाकेकर, अभय टाकसाळ, अशोक जाधव, सोशालिस्ट डेमोक्रॅटिक पार्टीचे सय्यद जलील, राजमल राठोड, शैलेश मिसाळ, काशिनाथ पवार, युसुप पटेल सह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी हजर होते.